महा मेट्रो आणि ट्रॅफिक पोलीस दरम्यान मेट्रो संवाद
– ट्रॅकिक विभागामध्ये नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याशी संवाद
नागपूर – नागपूर ट्रॅफिक विभागामध्ये नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याशी मेट्रो भवन येथे आज मेट्रो संवाद घेण्यात आला. सुमारे ४० ते ४५ पोलीस हेडकॉन्स्टेबल चा यामध्ये समावेश होता.
ज्यामध्ये महा मेट्रोच्या वतीने नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची संपूर्ण माहिती प्रदान करण्यात आली तसेच ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवरील कार्यरत मेट्रो स्टेशन येथील माहिती तसेच सोई सुविधा बद्दल अवगत करण्यात आले तसेच रिच – २ व रिच ४ येथे सुरु असलेल्या मेट्रो निर्माण कार्याबद्दल विस्तुत चर्चा करण्यात आली. पोलीस व ट्रॅकिक पोलीस विभागाचे मेट्रो निर्माण कार्या दरम्याने नेहमीच चांगले सहकार्य महा मेट्रो प्रशासनाला लाभले व वेळो वेळी सुचविलेल्या दिशा निर्देशांवर अंबलबजावणी महा मेट्रो तर्फ करण्यात आली.
आयोजित मेट्रो संवाद दरम्यान शहरातील गाड्यांची संख्या तसेच त्या पासून निर्माण होणारे दुशपरिणाम, रस्त्यावरील अपघाताचे ग्राफ यावर विस्तुत सादरीकरण मेट्रो तर्फे करण्यात आले. महा मेट्रो व मनपा तर्फे सुरु असलेल्या फिडर वाहतूक सेवा, ई-रिक्षा , इलेक्ट्रिक फिडर सर्विस बाबत माहिती यावेळी देण्यात आली. तसेच संवाद दरम्यान उपस्थित शंकाचे निरसन यावेळी महा मेट्रोच्या वतीने करण्यात आले. योग्य उपाय योजना करून कश्या प्रकारे नागरिकांना मेट्रोचा उपयोग करण्याकरिता प्रेरित करणे तसेच स्वतः देखील शक्य असेल तेवढे स्वतः चे वाहन न वापरता सार्वजनिक वाहतूक साधनाचा उपयोग करने यावर विस्तृत चर्चा महा मेट्रो आणि ट्राफिक पोलीस विभागा दरम्यान करण्यात आले.