Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Wed, Jan 20th, 2021

    राज्यपालांच्या हस्ते मेश्राम यांना कोरोना वॉरियर पुरस्कार सन्मान

    – पुरस्कार मुळे परिसरात आनंद व शुभेच्छा,

    वाडी(अंबाझरी): गुरुप्रसाद नगर वाडी येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. सुशांत हिरामण मेश्राम यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते कोरोना कालावधीत उत्कृष्ट सेवा प्रदान केल्या बद्दल पूरस्कृत करण्यात आले.या मूळे दत्तवाडी निवासी परिसरात त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

    डॉ.सुशांत मेश्राम हे सध्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल,नागपूर येथील प्लमोनरी विभागाचे विभाग प्रमुख पदावर कार्यरत आहेत.या कोरोना साथीच्या काळात मेडिकल येथे तयार करण्यात आलेल्या स्पेशल करोना वॉर्डचे ते प्रमुख होते.त्या काळात त्यांनी अहोरात्र करोना रुगणांना उत्कृष्ट आरोग्यदायी सेवा पुरविली. त्यांच्या या उत्कृष्ट रुग्ण व समाजसेवे ची शासकीय स्तरावर दखल घेऊन प्रशासनाकडून या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.नुकतीच महामहिम राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते डॉ सुशांत मेश्राम यांना कोरोना वीर सन्मान पुरस्कार विशेष सोहळ्यात प्रशस्तीपत्र व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

    डॉ. सुशांत मेश्राम यांना मिळालेल्या या पुरस्काराने वाडी-दत्तवाडीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.परिसरसतील प्रतिष्ठित नागरिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ सभापती भारती पाटील,माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे,पेन्शनर्स असोसिएशनचे प्रमुख पी के मोहनन,एच.मेश्राम,कामगार नेते श्रीराम बाटवे,माजी सभापती कल्पना सगदेव,प्रमिला पवार,जोती भोरकर,प्रा सुरेंद्र मोरे,अभिजित जोशी,बीरे,साकुरे,विलास मेश्राम,बिपिन टेंभुर्णे,अशोक राऊत,मानसिंग ठाकूर,राहुल सोनटके,राजाभाऊ जोध,संजय जीवनकर, राजेश जीरापुरे,योगेश चनापे,वाडी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य आदी नी अभिनंदन करून या पुरस्काराने वाडीचे नाव ही उंचविल्याचे मत व्यक्त केले.


    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145