| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 30th, 2020

  महापौर पदाची निवडणूक ५ जानेवारीला

  – ३० डिसेंबरला नामनिर्देशन : उपमहापौर पदासाठीही निवडणूक

  नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उर्वरित कालावधीसाठी ५ जानेवारी २०२१ला निवडणूक होणार आहे. मंगळवारी (५ जानेवारी २०२१) रोजी सकाळी ११.०० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये यासंबंधी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी हे पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहतील.

  २१ डिसेंबर रोजी संदीप जोशी यांनी महापौर पदाचा व मनीषा कोठे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा मनपा आयुक्तांकडे सादर केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे पत्र पुढील कार्यवाही करिता सचिवालय विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार पुढील उर्वरित कालावधीसाठी महापौर व उपमहापौर निवड प्रक्रिया सुरू झाली आहे.

  ३० डिसेंबरला महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले जाईल. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत निगम सचिव इच्छुकांचे नामनिर्देशन स्वीकारतील.

  ५ जानेवारीला सकाळी ११ वाजता सभा सुरू झाल्यानंतर पिठासीन अधिकाऱ्यांद्वारे नामनिर्देशनपत्राची छानणी केली जाईल. यानंतर वैध उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल व अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटाचा वेळ देण्यात येईल. पिठासीन अधिकारी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे घोषित करतील. यानंतर आवश्यक असल्यास मतदान घेतले जाईल. सभेच्या शेवटी पिठासीन अधिकाऱ्यांद्वारे निवडणूक निर्णयाची घोषणा केली जाईल.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145