नागपूरमध्ये होणार तब्बल ४० पोलिस ठाण्यांची स्थापना; डीसीपी संदीप पखाले यांच्याकडे परिमंडळ ६ ची धुरा!
नागपूर :शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाढता भौगोलिक विस्तार लक्षात घेता, गृहमंत्रालयाने नागपूर शहरात नव्या पोलिस ठाण्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. काही विद्यमान ठाण्यांचे कार्यक्षेत्र विभागून नवी ठाणे उभारली जाणार आहेत, तसेच ग्रामीण भागातील काही क्षेत्रेही शहर पोलिस आयुक्तालयाच्या...
नागपूर ‘दक्षिण’मध्ये शिवसेनेला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!
नागपूर: नागपूर शहराच्या राजकारणात गुरुवारी मोठी उलथापालथ झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नागपूर ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघाचे प्रभावी उपजिल्हाप्रमुख मुकेश रेवतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भव्य प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे नागपूर ‘दक्षिण’ भागातील शिवसेनेच्या संघटनेला मोठा धक्का बसला असून, त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते आणि...
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा 72 तासांचा संप सुरु; राज्यभर वीजपुरवठ्यावर संकट!
मुंबई : महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी चिंतेची बातमी आहे. राज्यातील महावितरणमधील सात कर्मचारी संघटनांनी ९ ते ११ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ३ दिवसांच्या संपाची हाक दिली आहे. खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला असून, त्यामुळे राज्यभरातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संपाचे मूळ कारण...
धंतोली परिसरात गोंधळ,आरोपी मुन्ना यादवविरोधात गलिच्छ शिवीगाळसह धमकीप्रकरणी गुन्हा दाखल
नागपूर: धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री गल्लीतील वादातून झालेल्या गोंधळानंतर दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जग्गू ननकू यादव (वय 50, रा. प्लॉट क्र. 85, एनआयटी लेआउट, जुनी अजनी, वर्धा रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात...
नारा परिसरात कुख्यात गुंडाचा मित्राकडून खून; आरोपी फरार, जरीपटका पोलिसांची शोधमोहीम सुरू
नागपूर: नारा भागात बुधवारी पहाटे एका कुख्यात गुंडाचा त्याच्याच मित्राने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृताचे नाव बाबू चत्री असे असून, आरोपी मित्राचे नाव शाहू असे समजते. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, जरीपटका पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके...
शिवसेना नाव-चिन्ह वादात पुन्हा विलंब; सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आता १२ नोव्हेंबरला!
नवी दिल्ली: शिवसेनेच्या नाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या वादावर आज अंतिम सुनावणी अपेक्षित होती, मात्र ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची पुढील तारीख १२ नोव्हेंबर अशी निश्चित केली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी...
शिवसेना चिन्ह प्रकरणात आज निर्णायक सुनावणी; ‘धनुष्यबाण’ कोणाचा शिंदे की ठाकरे?
नवी दिल्ली: शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावरील वादात आज (8 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे वकील असीम सरोदे यांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...
शिवसेना चिन्ह प्रकरणात आज निर्णायक सुनावणी; ‘धनुष्यबाण’ कोणाचा शिंदे की ठाकरे?
नवी दिल्ली: शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावरील वादात आज (8 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे वकील असीम सरोदे यांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’...
फुटाळा फाऊंटन प्रकल्पाचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाचा तलाव वेटलँड मानण्यास नकार!
नागपूर: सुप्रीम कोर्टाने नागपूर सुधार न्यास (NIT) ला मोठा दिलासा देत फुटाळा तलावाला आर्द्रभूमी (Wetland) मानण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे NIT द्वारे तलावाजवळ सुरू केलेले संगीत फव्वारा (Musical Fountain) आणि इतर विकासकामे सुरळीतपणे पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एनजीओची याचिका...
नागपुरात कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लि. परिसरात आयटीची धाड; नितिन खारा अडचणीत
नागपूर: नितिन खारा यांच्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लि. अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या गो गॅस कंपनीच्या गोदामावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या छापेमारीदरम्यान कंपनीकडे ठेवलेल्या एलपीजी गॅसच्या स्टॉकची तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कंपनीकडे स्टॉक लाइसन्सशिवाय एलपीजी गॅस ठेवणे आणि त्याची खरेदी-विक्री करणे हा कायद्याने प्रतिबंधित आहे. त्यामुळे कंपनीवर बिना...
मराठा समाजाला दिलासा;कुणबी प्रमाणपत्रांवरील GRला मुंबई हायकोर्टाने अंतरिम स्थगिती नाकारली!
मुंबई – मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने २ सप्टेंबरला जाहीर केलेल्या कुणबी प्रमाणपत्रांवरील GRला मुंबई हायकोर्टाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर आज खंडपीठाने सुनावणी केली. कोर्टाने स्पष्ट केले की, राज्य सरकार...
कोराडी नाक्यावर ऑपरेशन यु टर्न; कारमधून ७ ग्रॅम MD जप्त, ड्रायव्हर आढळला नशेत!
नागपूर : कोराडी नाका येथे मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२:३० वाजता "ऑपरेशन यु टर्न" अंतर्गत पोलिसांनी वाहन तपासणी केली असता एका कारमधून ७ ग्रॅम MD सापडले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालक नशेत असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे त्याचे वाहन तपासण्यात आले. तपासणीत MD...
नागपूरच्या खरबीत भीषण अपघात;भरधाव बसच्या धडकेत १७ वर्षीय युवतीचा मृत्यू
नागपूर : शहरातील खरबी परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात १७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणीचे नाव भाग्यश्री टेंबरे असे असून ती नागपूर येथील रहिवासी होती. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री आपल्या मोपेडवरून जात असताना मागून येणाऱ्या भरधाव बसने...
नागपुरात एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली साडे २५ लाखांची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल
नागपूर : मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली सावनेर येथील एका तरुणीची तब्बल साडे २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी चार आरोपींविरोधात फसवणूक आणि कटकारस्थानाचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार समध्दी राजू...
दिवाळीत सरकारकडून खास गिफ्ट; पूरग्रस्तांना मिळणार २१०० रुपये किंमतीचं २५ वस्तूंचं मोफत किट!
मुंबई - यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले. धाराशिव, सोलापूर, बीड आणि अहमदनगर या भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी घुसून संसार उद्ध्वस्त झाले. पिकांचे, अन्नधान्याचे आणि घरगुती वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांसाठी सरकारचा मोठा निर्णय- पूरग्रस्त...
सुप्रीम कोर्टमध्ये वकीलाचा हंगामा; CJI बी. आर. गवईकडे चप्पल फेकण्याचा प्रयत्न!
नवी दिल्ली – आज सुप्रीम कोर्टमध्ये एक वकीलाने चीफ जस्टिस ऑफ इंडिया (CJI) बी. आर. गवई यांच्या समोर हंगामा करण्याचा प्रयत्न केला. माहिती नुसार, वकीलाने जजकडे चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला, पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्याला रोखले. घटनेनंतर आरोपी...
दिवाळीपूर्वी वीज दरवाढीचा झटका; महावितरणकडून प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढ
नागपूर : दिवाळीच्या सणासुदीत वीज बिलावर मोठा झटका! महावितरणने ऑक्टोबर महिन्यातील बिलांसाठी नवीन दर जाहीर केले असून, घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहक सर्वांवर याचा परिणाम होणार आहे. प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ झाल्यामुळे ग्राहकांना सणपूर्वी आर्थिक ताण सहन...
आज कोजागिरी पौर्णिमा; जाणून घ्या पूजा पद्धत, महत्त्व आणि श्रद्धा!
मुंबई : आज आश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा —हिंदू पंचांगानुसार वर्षातील एक अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. आजच्या दिवशी चंद्र आपली पूर्ण कलांकृती गाठतो आणि त्याचा तेजस्वी प्रकाश पृथ्वीवर अमृतासारखा बरसतो, अशी श्रद्धा आहे....
GH–Medical फीडरवरील इंटरकनेक्शन कामासाठी 24 तास जलपुरवठा बंद राहणार
नागपूर – नागपूर महानगरपालिका (NMC) आणि ऑरेंज सिटी वॉटर (OCW) यांच्या संयुक्त विद्यमाने GH–Medical फीडरवरील 24 तासांचा जलपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा बंद 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून ते 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00...
शिवभोजननंतर ‘आनंदाचा शिधा’ही बंद? सरकारी तिजोरी रिकामी असल्याच्या चर्चा जोरात
मुंबई : राज्य सरकारच्या लोकप्रिय योजनांवर पुन्हा एकदा बंदीची छाया दिसू लागली आहे. एकेकाळी गरीब आणि सामान्य जनतेसाठी ‘आनंदाचा शिधा’ ही योजना म्हणजे सणासुदीचा दिलासा ठरत होती. परंतु, यंदा गणेशोत्सव आणि दिवाळी दोन्ही सणांपूर्वीही या योजनेचा काही ठावठिकाणा नाही. त्यामुळे...
महाराष्ट्र सरकारची ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपवर तात्काळ बंदी; औषध सापडल्यास करा थेट तक्रार
मुंबई : बालकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या औषधांवर सरकारने कडक भूमिका घेतली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये लहान मुलांचे मृत्यू झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपवर विक्री, उत्पादन आणि वितरणाची पूर्ण बंदी घातली आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) या निर्णयाची...






