| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 14th, 2020

  मनपातील मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने मानले ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे आभार

  नागपूर : महानगर पालिकेतील कर्मचारी शिक्षक व निवृत्त वेतन धारकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी त्वरित लागू करण्याबाबत पुढाकार घेणारे राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे मनपा मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वागत करून आभार मानण्यात आले.

  नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे अनेकदा निवेदने देण्यात आली होती. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी यासाठी शासन दरबारी पुढाकार घेतला. राज्याचे मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांचेसोबत बैठक घेऊन विषयाचे गांभीर्य समाजवून सांगितले. अखेर नागपूर महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंबंधीचा प्रश्न मार्गी लागला. यासंदर्भातील परिपत्रक ८ डिसेंबर रोजी नगर विकास विभागाने काढले.

  मनपातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यास पुढाकार घेतल्याबद्दल नागपूर महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सचिव अशोक कोल्हटकर यांच्या नेतृत्वात ना. डॉ. नितीन राऊत यांचे अभिनंदन करण्यात आले. पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, राजेश रहाटे, ग्रंथालय अधीक्षक श्रीमती अलका गावंडे, इंजि. कल्पना मेश्राम, पांडुरंग जगताप, विशाल शेवारे, विनोद धनविजय, जयंत बनसोड, विनोद राऊत, अधीर बनसोड, ॲड. अमोल रामटेके, राजेश वासनिक व बहुसंख्य पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145