महा मेट्रो : आकार घेत आहे अग्रसेन चौक मेट्रो स्टेशन
– अग्रसेन चौक मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य ८९% पूर्ण
नागपूर – महा मेट्रोच्या (रिच – ४) सिताबर्डी ते प्रजापती नगर कॉरीडोरचे कार्य जलद गतीने सुरु असून, या मार्गिकेवर रूळ बसविण्याचे कार्य सुरु आहे तसेच या मेट्रो मार्गिकेवरील ८९% व्हायाडक्टचे कार्य पूर्ण झाले असून सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील अग्रसेन चौक मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य ८९% पूर्ण झाले असून सदर मेट्रो स्टेशन आता आकार घेत आहे.
या मार्गावरील निर्माण कार्यदरम्यान लावण्यात आलेले बॅरिकेडस बहुतेक भागातील प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आल्याने बॅरिकेडस काढण्यात आले आहे.