| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jan 21st, 2021

  मनपा-OCW कन्हान ९००मिमी लाईनवर मोठी गळती

  उद्या 22 जाने ला रात्री करणार दुरुस्त

  तातडीचे शटडाऊन: सतरंजीपुरा व आशीनगर झोन मधील १५ जलकुंभा चा पाणी पुरवठा २३ जानेवारी (शनिवार) रोजी राहणार बाधित

  दुरुस्तीच्या कामादरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठाही राहणार बंद

  नागपूर : कन्हान जलशुद्धीकरण केंद्राहून निघणाऱ्या ९०० मिमी व्यासाच्या फिडर मेनवर बिनाकी ४०० मी मी च्या जलवाहिनीवर मोठी गळती उद्भवली आहे. या गळतीतून पाण्याचा मोठा अपव्यय होत असल्यामुळे तातडीने याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

  या दुरुस्तीसाठी मनपा-OCW यांनी २२ जानेवारी रोजी रात्री १० वाजेपासून २३ जानेवारी सकाळी १० पर्यंत १२ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरवले आहे.

  कन्हान ९०० मिमी व्यासाच्या फीडर लाईनवरून पाणीपुरवठा होणारे भाग या कामामुळे बाधित राहतील.

  या तातडीच्या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे आशीनगर व सतरंजीपुरा झोनमधील भाग खालीलप्रमाणे:

  सतरंजीपुरा झोन
  १.बस्तरवारी जलकुंभ १: लालगंज, तेलीपुरा पेवथा, , झाडे चौक, नारायणपेठ, प्रेम नगर, बस्तरवारी, बैरागीपुरा, कैमीबाग, श्रीराम वाडी, गोंडपुरा, सुदर्शन कॉलोनी, पहाडपुरा

  २.बस्तरवारी जलकुंभ २अ: जोशीपुरा, आनंदनगर, मेहंदीबाग कॉलोनी, पोळा मैदान, जामदारवाडी, वृंदावन नगर, बापू अणे नगर, कुंदनलाल गुप्ता नगर, नूरी चौक, इंदिरा नगर, बोहरा कब्रस्तान, कांजी हाऊस, राणी दुर्गावती नगर, जय भोले नगर

  ३.बस्तरवारी जलकुंभ २ब: बांगलादेश, नाईक तलाव, संभाजी कासार चौक, मुसलमानपुरा, बैरागीपुरा, उमाठेवाडी, वसुलेवाडी, चंद्रभागा नगर, तांडापेठ, विणकर कॉलोनी, मोचीपुरा, लाल दरवाजा

  ४.GH वाहनठिकाणा: वाहनठिकाणा, बारसेनगर, सोभाखेत, गोंडपुरा, कुऱ्हाडकरपेठ, घसारीपुरा, लष्करीबाग, नवा नकाशा, ज्योती नगर

  आशीनगर झोन:

  १.बिनाकी १: हमीद नगर, योगी अरविंद नगर, सरोदाबाग, संजीवनी क्वार्टर, संघर्ष नगर, पांडे बस्ती, मेहबूबपुरा, भंसले बस्ती (शिवाजी चौक), प्रवेश नगर, संगम नगर, गरीब नवाज नगर, शिवशक्ती नगर, यशोधरा नगर, पवन नगर

  २.बिनाकी २: यादव नगर, एकता कॉलोनी, बंदे नवाज नगर, सुदाम नगर, स्वीपर कॉलोनी,

  ३.बिनाकी एग्झीस्टिंग: यशोदीप कॉलोनी, महेंद्र नगर, पचकुवा, वीरचक्र सोसायटी, फारुख नगर, खंते नगर, वैशाली नगर, बाबा बुधाजी नगर,

  ४. इंदोरा २: मुकुंद नगर, नई बस्ती, हबीब नगर, देवी नगर, टेका, सिद्धार्थ नगर, बाळाभाऊपेठ, गुरुनानकपुरा, अशोक नगर, वैशाली नगर, ताज नगर, बुद्ध नगर, आशी नगर

  ५. इंदोरा १: चौकस कॉलोनी, आंबेडकर कॉलोनी, ठवरे नगर, माया नगर, विद्या नगर,

  मनपा-OCW यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. या काळात टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही.

  नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.

  Toll Free No: Citizens can make any water related query, complaints at OCW on a Toll Free Helpline- No 1800-266-9899

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145