| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Jan 24th, 2021

  काचुरवाही – किरणापूर कॅनलचा पुलाला पडल्यात भेगा

  – पाटबंधारे विभाग कुंभकर्णी झोपेत.
  – रामटेक तालुक्यातील धोकादायक प्रकार

  रामटेक : काचुरवाही येथून किरणापूरला पांधन रस्ता गेलेला आहे,त्या पांधन रस्त्याचे काम आता,काचुरवाही-किरणापूर ह्या मुख्यमंत्री ग्राम सङक योजना १९-२० अंतर्गत डांबरी रस्याचे काम प्रगती पथावर असून त्या रोडवर मुरूमाचे जड ट्रकची वाहतूक मुरूम टाकण्याकरिता होत असून त्या पुलाची क्षमता ही क्षतीग्रस्त झालेली पुलाला तङे गेलेले आहेत तो पूल जिर्ण अवस्थेत असेला असून तो पूल केव्हाही पडू शकतो,त्या सी- मायनर वरील पुलाचे बांधकाम करण्यास रामटेक पाटबंधारे विभाग कुंभकर्णी झोपेत आहे . याच पुलावरून पाटबंधारे विभागाचे अभियंते मायनरची पाहणी करण्याकरिता येतात मात्र त्याचे स्पेशल दुर्लक्ष होताना दिसत आहे.

  तरी पण या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी,असे सुनिल कोल्हे , अनिल ङोकरीमारे , सरपंच शैलेश राऊत, प्रहारचे नागपूर जिल्हा अध्यक्ष रमेश कारामोरे , , सदस्य कल्पना नाटकर , प्रहार पक्षाचे कार्यकर्ते उमेश महाजन , श्रीकांत बावनकुळे, गजानन भलमे, चंदु बावनकुळे, , नंदू नाटकर,विनोद नाटकर, गजानन भलमे , गणेश तायवाडे, शुभम कामळे, याचा सह स्थानिक परिसरातील शेतकऱ्यानी केली

  सोबत छायाचित्र : एकीकडे मोडकळीस पुलाची अवस्था तर दुसऱ्या छायाचित्र पुलाला भेगा पडलेल्या

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145