| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Dec 17th, 2020

  तगडी स्टारकास्ट असलेला ‘भारत माझा देश आहे’

  अहिंसा परमो धर्म:, धर्म हिंसा तथैव च:’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर झळकल्यानंतर आता चित्रपटातील कलाकारही प्रेक्षकांसमोर आले आहेत.

  खरं तर टिझर पोस्टर पाहिल्यावर या चित्रपटात कोण असणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती आणि अखेर याचे उत्तर मिळाले आहे. मालिकेतील ‘लाडू’ या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेल्या राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत या बालकलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम, हेमांगी कवी, नम्रता साळोखे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. एकंदरच तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असल्याचा अंदाज आपण टिझर पोस्टरवरून लावूच शकतो.

  एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित ‘भारत माझा देश आहे’ची कथा आणि दिग्दर्शन पांडुरंग कृष्णा जाधव यांनी केले आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद निशांत नाथाराम धापसे यांचे असून संगीत अश्विन श्रीनिवास यांचे आहे. तर समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत. चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांचे आहे. टिझर पोस्टर, चित्रपटातील कलाकार समोर आल्यांनतर आता चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145