Published On : Wed, Feb 12th, 2020

कामठी लोकअदालतीत 131 प्रकरणे निकाली, सतरा लाख पंधरा हजार रुपये कर वसुली

Advertisement

कामठी :- कामठी तालुका विधी प्राधिकरण व कामठी न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महालोक अदालत बँक ग्रामपंचायत यांची यांचे प्रकरण131 प्रकरणे निकाली लावून सतरा लाख पंधरा हजार तीनशे अकरा रुपये कर वसूल करण्यात आला महालोक अदालत चे उद्घाटन कामठी येथील प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायाधीश डी आर भोला यांचे हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी न्यायाधीश एस एस. गाढवे कामठी तालुका विधी संघाचे अध्यक्ष मनोविकास शर्मा , ऍड,मनोज शर्मा ,डी जी रामटेके,पी एस पुडके, माला कुरील, व्ही यम जगडे, वाय, झेड, बागडे, के यम,जागडे, ये बी रामटेके, भूषण तिजारे, रीना गणवीर, एस एम, कुशवाह, प्रतिभा जामठे, सरोज भगत, एच एस साखरे ,प्रांजल मंडलेकर एम आर गोडबोले एच,डी धुळे ,कल्पना तराळे प्रकाश धामणगावे, प्रकाश मुसळे, अशोक आत्राम ,पी टी गजभिये.

एस एस अढाऊ उपस्थित होते महालोक अदालत मध्ये बँक व ग्रामपंचायतीचे 12 67 प्रकरने ठेवण्यात आली होती त्यातील 123 प्रकरण निकाली लागले असून 123 प्रकरणातून 15 लाख 82 हजार तीनशे अकरा रुपयाच्या कर वसूल करण्यात आले तर फौजदारी दीवानी चे 248 प्रकरण ठेवण्यात आली होती त्यात आठ प्रकरण निकाली लागली असून त्याच्यातून एक लाख 33 हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला महालोक अदालतीत 131 प्रकरणे निकाली लावण्यात आले असून 17लाख 15 हजार 311 रुपयांचा कर वसूल करण्यात आला महालोक अदालत मध्ये मार्गदर्शन करताना न्यायाधीश डी आर भोला म्हणाले ग्रामीण भागातील नागरिकांनी महालोक अदालत मध्ये सहभागी होवुन आपसी तंटे , भाडण मिटविण्याचे आव्हाव केले कार्यक्रमाचे संचालन ऍड पी एस पुडके यांनी केले आभार एस एस अढाऊ यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी नागरिक उपस्थि होते

संदीप कांबळे कामठी