| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Dec 22nd, 2020
  Latest News | By Nagpur Today Nagpur News

  संदीप जोशी यांच्या कार्यकाळात झालेले महत्वाचे कार्य

  – नागपूर शहराचे महापौर म्हणून नियुक्त होताच पहिला महत्त्वाचा पुढाकार हार, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न स्वीकारता तो पैसा शहरातील गरजूंना उपयोगात यावा यासाठी ‘महापौर सहायता निधी’ची सुरुवात.

  – महापौर पदावर आपण असो नसो ही योजना बंद होउ नये यासाठी त्यांनी ‘मेयर रिलिफ फंड’ नावाने कायदेशीर बाबींची पूर्तता करून कंपनीची नोंदणी करून घेतली.

  – नागपूर शहरातील प्रसाधनगृहांची तोकडी व्यवस्था पाहता संपूर्ण महापौर निधी शहरातील विविध भागात प्रसाधनगृह तयार करण्यासाठी वापरण्याचा निर्णय.

  – शहरातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी, प्रश्न जाणून घेण्यासाठी ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रम सुरू.

  – ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यक्तींसोबत शहरातील समस्या आणि त्यावरील उपाय यावर संवाद.

  – नागरिकांना त्यांच्या तक्रारी, समस्या, प्रश्न थेट महापौरांपर्यंत मांडता यावे यासाठी झोननिहाय तक्रार निवारण शिबिर अर्थात जनता दरबाराचे आयोजन.

  – ऑनलाईन माध्यमातून तक्रार मांडून नागरिकांना स्वतःच आपल्या तक्रारीची स्थिती पाहता यावी या उद्देशाने ‘हॅलो महापौर’ ॲप’ची सुरुवात.

  – आपल्या शहराविषयी प्रेम व्यक्त करण्याच्या भावनेतून त अंबाझरी तलवानजीक स्वामी विवेकानंद स्मारक स्थळी ‘माय लव्ह माय नागपूर’ सेल्फी पॉईन्टचे निर्माण.

  – शहराविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती अभियान.

  – ‘मम्मी पापा यू टू’ या मोहिमेच्या माध्यमातून शाळकरी विद्यार्थ्यांनाच स्वच्छता दूत बनविण्याची आगळीवेगळी संकल्पना सत्यात उतरविली.

  – त्यासाठी विविध उपक्रमातून जनजागृती. संपूर्ण शहरभर मानवी साखळी तयार केली.

  – शहरातील खासगी बस थांब्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार.

  – कोरोना काळात अनवाणी पायाने जाणाऱ्या प्रवाशांचा प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. जिल्हाधिकार्यासोबत त्यांची भेट घेतली आणि प्रवास व्यवस्था करून दिली.

  – कोरोना काळात ‘कुटुंब रंगलंय गाण्यात’ उपक्रम राबवून घरात त्रासलेल्या लोकांसाठी अनोख्या स्पर्धेचे आयोजन.

  – स्थानिक उद्योगांना बुस्ट देण्यासाठी ‘व्होकल फॉल लोकल’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सत्यात उतरविण्यासाठी कार्य.

  – कोरोना काळात रस्त्यावर उतरून जनजागृती.

  – नागरिकांमधील भीती, शंका, संभ्रम दूर व्हावे, त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘कोव्हिड संवाद’ फेसबुक लाईव्ह. आय. एम. ए. च्या सहकार्याने 30 कार्यक्रम पूर्ण.

  – लॉकडाउन काळात ५० स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १३ लाखांवर फूड पॅकेट्सचे वितरण

  – सुमारे ४० हजार विस्थापितांना दररोज दोन वेळचे भोजन वितरीत

  – नागपूर शहरात अडकलेल्या १२२१ विद्यार्थ्यांना भोजन वितरण

  – १७८४ दिव्यांगांना रेशन कीट पुरवठा

  – मनपाच्या २० रुग्णवाहिकांची संख्या वाढवून ६५ केली

  – १२ फिरते कोव्हिड चाचणी केंद्र

  – कम्यूनिटी व्हेजिटेबल मार्केट

  – एचडीएफसी बँकेच्या सीएसआर निधीमधून नागपूर महानगरपालिकेला एक कार्डीॲक रुग्णवाहिका, ड्यूरा सिलेंडर सिस्टीम, तीन मोबाईल क्लिनिक, एचएफएनओ मशीन मिळण्याबाबत प्रयत्न पूर्णत्वास

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145