लोकक्रांती पॅनल च्या वतीने मा.महापौरांचा सत्कार
नागपूर : मनपातील नियमित कर्मचारी व शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू करुन वेतन आयोगाची थकबाकी १६ महिन्यात देण्याचे आदेश निर्गमीत केल्याबददल मनपा लोकक्रांती पॅनल च्या वतीने महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांचा सत्कार करण्यात आला.
मनपा कर्मचा-यांना ७ वा वेतन आयोग जानेवारी पासून लागू करण्यात आला आहे. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी या संबंधीचे आदेश शुक्रवारी काढले. लोकक्रांती पॅनलचे प्रमुख श्री. राजू कनाटे यांनी सांगितले की, महापौरांनी मनपा कर्मचा-यांना नविन वर्षाची भेट दिली आहे. नागपूर महानगरपालिकेत ५ वा, ६ वा व ७ वा वेतन आयोग लोकक्रांती पॅनलच्या वतीने भेटला आहे. यापूर्वी कुठलिही थकबाकी चे लाभ कर्मचारी, शिक्षकांना आतापर्यंत मिळालेले नव्हते.
याप्रसंगी नागपूर महानगरपालिका कर्मचारी बँकेचे अध्यक्ष श्री. नितीन झाडे यांच्यासह सर्वश्री राजकुमार यादव, दिलीप देवगडे, धनराज मेंढेकर, शशी आदमने, दिलीप चौधरी, अनिल बारस्कर, संजय भाटी, आनंद ठाकरे, पुरुषोत्तम कळमकर, अनिल मेश्राम, शकील कुरेशी, कैलाश चंदनकर, श्रीमती प्रतिभा सिरीया, मिना नकवाल इत्यादी कर्मचारी व शिक्षक आदी उपस्थित होते.