Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Mon, Jan 4th, 2021

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मनपातर्फे अभिवादन

    नागपूर: स्त्री शिक्षणाचा पाया रचना-या क्रांतिज्योती सवित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. उपमहापौर मनिषा कोठे यांच्यासह नगरसेविका हर्षल साबळे यांनी सुभाष रोड येथील उद्यान आणि कॉटन मार्केट येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    याप्रसंगी माजी नगरसेवक मनोज साबळे, राजेश हाथीबेड, अशोक मेंढे, गणेश कडुकर, नरसींगराव निकम, प्रकाश जाधव, राजेश शर्मा, विनोद यादव आदी उपस्थित होते.

    नागपूर महानगरपालिका सिव्हील लाईन मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला माल्यार्पण केले. यावेळी घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.

    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145