Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Fri, Jan 29th, 2021

    पोलिओ जनजागृती रथाला हिरवी झेंडी

    ३१ जानेवारीला पोलिओ लसीकरण अभियान : दहाही झोनमध्ये होणार जनजागृती


    नागपूर : ‘पोलिओमुक्त भारत’ अभियानांतर्गत शहरातील ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना ३१ जानेवारी रोजी पोलिओ डोज देण्यात येणार आहे. या अभियानाची जनजागृती करण्यासाठी शुक्रवारी (ता. २९) ‘जनजागृती रथा’ला आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी हिरवी झेंडी दाखविली.

    यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. वैशाली मोहकर उपस्थित होते. ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत नजिकच्या लसीकरण केंद्र आणि पोलिओ बुथवर पोलिओ डोज देता येईल. यापूर्वी डोज घेतला असेल तरी संबंधित वयोगटातील प्रत्येक बालकाला डोज देणे आवश्यक आहे. ही माहिती शहरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचावी, या उद्देशाने जनजागृती रथ नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनअंतर्गत असलेल्या सर्व प्रभागांमध्ये फिरून जनजागृती करण्यात येणार आहे.

    पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ० ते ५ वयोगटातील सर्वच बालकांना पोलिओ डोज पाजावा, असे आवाहन महापौर श्री. दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.


    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145