Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Mon, Jan 18th, 2021

    ग्रामपंचायत निवडणूक नागपूर ग्रामीण भाजपच्या ताब्यात कायम कोराडी ग्रा.पं.मध्ये 17 पैकी 12 भाजपाचे

    नागपूर: नागपूर ग्रामीण तालुका भारतीय जनता पार्टी समर्थित पॅनेलचा ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झाला. बहादुरा ग्रामपंचायत भाजपाने आपल्या ताब्यात ठेवण्यास यश मिळविले आहे. भाजपाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांनी या निवडणुकीची व्यूहरचना केली होती.

    या निवडणुकीत श्री. बावनकुळे यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे यश मिळाले आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपा आणि आघाडी सरकार यांच्यात सरळ सामना झाला. भाजपाच्या उमेदवारांनी 80 टक्के यश संपादन केले.

    जिल्हा पातळीवर जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, महामंत्री अजय बोढारे, निवडणूक प्रभारी सचिन घोडे, तालुका महामंत्री सुनील कोडे, तालुका अध्यक्ष व ग्रा. प्रभारी नीलेश बुचुंडे यांनी अशा प्रकारची रचना करून निवडणुकीचे यश खेचून आणले.

    कोराडी ग्रामपंचातीतही निवडणुकीत चुरशीची झाली. या निवडणुकीत 17 पैकी 12 उमेदवार भाजपाचे विजयी झाले आहेत. काँग्रेसला फक्त 5 जागांवर समाधान मानावे लागले.


    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145