| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jan 9th, 2021

  शासनाचे दुर्लक्ष, घटनेची चौकशी करावी : चंद्रशेखर बावनकुळे

  ..मृतकांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन करताना भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सोबत माजी आ. चरण वाघमारे व अन्य.

  नागपूर: भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 10 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी असून या प्रकरणी त्वरित चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.

  श्री. बावनकुळे यांनी आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे भेट देऊन मृत झालेल्या मुलांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आ. चरण वाघमारे उपस्थित होते.

  भंडाराचा मी माजी पालकमंत्री आहे. पालकमंत्री असताना दर आठवड्याला मी भंडार्‍यात येऊन शासकीय अधिकार्‍यांच्या बैठकी घेतल्या व अडीअडचणींवर चर्चा करून उपाययोजना केल्या आहेत. तसेच अनेक नागरिकांच्या समस्याही ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या. भंडारा जिल्ह्याच्या विद्यमान पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे.

  जिल्हा सामान्य रुग्णालयाने दुरुस्तीसाठी प्रस्ताव 2020 मध्येच पाठविला असताना महाविकास आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. शासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असून मृतकांच्या परिवाराला प्रत्येकी 10 लाख रुपये नुकसानभरपाई शासनाने दिली पाहिजे, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145