सुवर्ण संधी २० जानेवारी २०२१ पर्यंत थकित मालमत्ता कर भरा व शास्तीत सुट मिळवा
अभय कर योजनेअंतर्गत मनपाचे आवाहन
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या थकित मालमत्ता कर दात्यांना दिलासा देण्यासाठी म.न.पा.ने आणखी एक संधी दिली आहे. त्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आकारण्यात येणा-या मालमत्ता कराच्या ३१ डिसेंबर, २०२० पर्यंतचा थकित कर रक्कम महानगरपालिका निधीत जमा केल्यास मनपाने लागू केलेल्या अभय योजने अंतर्गत शास्ती रक्कमेत ८०% सवलत देण्याची अंतीम तारीख २० जानेवारी २०२१ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
मनपाचे महापौर श्री.दयाशंकर तिवारी, स्थायी समिती सभापती श्री. विजय (पिंटू) झलके व मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी नागरिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.