| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Dec 11th, 2020

  खादी वस्त्रांचे प्रदर्शन, फॅशन कॉंटेस्ट मेट्रो स्टेशनवर

  – दिव्यांग मुलं देखील होणार सहभागी या उपक्रमात


  नागपूर– प्रवाशांच्या सोई करता महा मेट्रो तर्फे अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रम आणि योजनांना नागपूरकरांतर्फे चांगला प्रतिसाद मिळतो आहे. `सेलीब्रेशन ऑन व्हील्स’, `बँड स्टॅन्ड’ सारख्या उपक्रमांच्या माध्यमाने उपयुक्त प्रतिसाद महा मेट्रोला मिळतो आहे. स्वकीयांचा वाढ दिवस साजरा करण्याकरता नागपुरकर मेट्रो ट्रेन बुक करीत असून वेगळाच आनंद या निमित्ताने मिळवत आहेत. सीताबर्डी इंटरचेन्ज येथे बँड स्टॅन्ड वर कार्यक्रम संगीताचे कार्यक्रम देखील साजरे झाले असून या कार्यक्रमाला नागपूरच्या संगीत प्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

  या सोबतच नागपूरच्या संस्थांनी विविध प्रकारच्या प्रदर्शनाचे देखील आयोजन मेट्रो स्टेशनवर केले आहे. छंद वैभव सारख्या संस्थे तर्फे जुन्या वस्तूंचे किंवा नागपूरच्या स्थानिक कलाकारांकडून पेंटिंग सारख्या विषयावर प्रदर्शनाचे आयोजन या आधी सीताबर्डी आणी सुभाष नगर मेट्रो स्टेशनवर झाले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आता खादीच्या वस्त्रांचे प्रदर्शन २९ डिसेंबर २०२० रोजी होऊ घातले आहे. लॉयन्स क्लब स्नेह धागा आणि यह जिंदगी फाउंडेशन – या स्वयंसेवी संस्थेतर्फे हे प्रदर्शन होत आहे.

  या कार्यक्रमात भाग घेणारे सर्व सहभागी खादीचे वस्त्र परिधान करणार आहेत. याच प्रदर्शनाचा आणखी एक म्हणजे फॅशन कॉंटेस्ट – खादी वॉक २०२०. खादीच्या वस्त्रांचा प्रसार आणि प्रचार होण्याकरता या कॉंटेस्टचे आयोजन होणार आहे. खादी वॉक २०२० चे आयोजन मेट्रो ट्रेन आणि सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर होणार आहे. या संपूर्ण उपक्रमाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे दिव्यांग मुलं देखील यात सहभागी होणार आहेत. Mr खादी, Ms खादी आणि Mrs खादी असे तीन विविध श्रेणीत विजेते निवडले जातील.

  या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता येत्या उद्या (१२ डिसेंबर) ला ऑडिशन होणार असून यात सहभागी होण्याकरता इच्छुक असणाऱ्यांनी 9503096350 & 8208596695 – या दोन क्रमांकावर संपर्क साधावा.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145