| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jan 20th, 2021

  संत्रा मार्केटमधील अतिक्रमणाचा सफाया

  तिसऱ्या दिवशीही दहाही झोनमध्ये कारवाई सुरूच

  नागपूर : शहरातील वाढते अतिक्रमण आणि त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेता नागरिकांकडून वारंवार प्राप्त होणा-या तक्रारींवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गांभीर्याने दखल घेत संपूर्ण शहरात एकाचवेळी अतिक्रमण निर्मूलन कारवाईचे निर्देश दिले. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार नागपूर शहरातील मागील तीन दिवसांपासून विविध ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यात येत आहेत.

  अनेक वर्षांपासून, महिन्यांपासून रस्त्यावर, फुटपाथवर असलेले अतिक्रमण सक्तीने हटवून साहित्य जप्त केले जात असल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे व मनपाच्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

  मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या कारवाईमध्ये बुधवारी (ता.२०) गांधीबाग झोन अंतर्गत येणा-या संत्रा मार्केटमधील अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. याशिवाय शहरातील इतरही झोन अंतर्गत येणा-या भागांमधील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. उपायुक्त (अतिक्रमण) श्री. महेश मोरोणे यांच्या मार्गदर्शनात सर्व झोनचे सहायक आयुक्तांच्या नेतृत्वात प्रत्येक झोनमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145