| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Dec 1st, 2020

  रोजगारनिर्मितीतून स्थानीय अर्थव्यवस्थेला चालना

  नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर संयुक्तपणे राबवीत असलेल्या २४x७ पाणीपुरवठा योजनेने नागपूर शहरात उत्कृष्ट पाणीपुरवठा सेवा देण्यासोबतच रोजगार निर्मितीत मोठा वाट उचलला आहे. स्थानिक युवांना रोजगार संधी देत नागपूर शहराच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्याचे मोलाचे काम यातून मनपा-OCWने साध्य केले आहे.

  भारताचे भौगोलिक मध्य असलेले नागपूर शहर हे देशातील सर्वात जलदगतीने विकसित होत असलेले शहर आहे. २०१६ साली स्मार्ट सिटीजमध्ये समावेश झाल्यानंतर देशातील मोठी बाजारपेठ म्हणून नागपूर नावारूपास येत आहे. त्यामुळे व्यापार आणि विकासकामांना येथे अधिकाधिक चालना मिळत आहे. यासोबतच वाढत्या लोकसंख्येमुळे सर्व नागरिकांना पाणी पुरवठा करणे हे नागपूर महानगरपालिकेचे महत्वाचे उद्दिष्ट बनले.

  २०१२ मध्ये नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व मुबलक पाणी पुरवण्याच्या उद्देशाने नागपूर २४x७ पाणीपुरवठा योजनेच्या अमलबजावणीला सुरुवात केली. यातून घरोघरी पाणी पुरवठा सुरु होण्यासोबतच मोठ्या प्रमाणवर रोजगार देखील उपलब्ध झाले. मोठ्या प्रमाणावर तयार झालेल्या या रोजगाराच्या संधीतील ८०% संधी स्थानीय युवक-युवतींना देण्यात आलेल्या आहेत.

  आज १५००हून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्मचाऱ्यांसह OCW नागपुरातील सर्वात जास्त रोजगार संधी देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. OCWने विशेष जलशुद्धीकरण केंद्र येथे काम करणाऱ्या तंत्र कुशल चमूपासून ते ग्राहक सेवा विभागात काम करणाऱ्या तसेच सोशल वेल्फेअर चमू अशा अनेक कुशल कर्मचाऱ्यांची फौज नागपूरकरांच्या दिमतीला तैनात केलेली आहे. शहरात स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासोबतच अप्रत्यक्ष रोजगार व व्यवसाय संधींमुळे अर्थव्यवस्थेला बळकट करण्यातही हातभार लावला आहे. ही संपूर्ण व्यवस्था चालवीत असताना OCW शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजेस मधील विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस रिक्रुटमेंट’च्या माध्यमातून नियमित संधी देत असते.

  याशिवाय OCWद्वारे करण्यात आलेली एक अभिनव सुरुवात म्हणजे टँकर व्यवस्थापन या पुरुषी वर्चस्व असलेल्या कार्यक्षेत्रात स्त्रियांना देण्यात येत असलेली संधी. OCW मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महिला हायड्रंट सुपरवायझर्सटँकर व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

  याबाबत बोलताना OCWचे मानव संसाधन महाव्यवस्थापक श्री कुलदीप सिंह म्हणतात, “व्यवस्थापन मग ते कुठलेही असो महिला ते जबाबदारीने व संवेदनशीलतेने सांभाळू शकतात असा आम्हाला विश्वास आहे. हा विश्वास आमच्या महिला सुपरवायझर्सने सार्थ ठरविला आहे. सुरुवातीला हे पाउल उचलताना मनात कुठेतरी असलेली धाकधूक आमच्या सक्षम महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या कुशल कामाच्या माध्यमातून यशस्वीपणे दूर केली.”

  हायड्रंट सुपरवायझर गायत्री कटारे यांनी सांगितले कि, “आमचे काम निश्चितच आव्हानात्मक आहे. दररोज विविध प्रकारच्या लोकांना सामोरे जावे लागते. अनेकदा परिस्थिती गंभीर स्वरूप घेते. मात्र या दररोजच्या कामातील आव्हानातच कामाची खरी कसोटी आहे आणि यात एक वेगळेच समाधानदेखील आहे. OCW व आमचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन आम्हाला निरंतर हे काम करत राहण्याची उर्मी देते.”

  कोरोना महामारीच्या कठीण काळातदेखील सर्व कर्मचारी, प्लंबर्स, फिटर्स, टँकर ड्रायव्हर्स, व्हॉल्वमेन, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर्स व OCWवर अवलंबून असलेल्या इतर कामगारांनाही सर्व देय आर्थिक मोबदले निरंतर देत नागपुरातील हजारो कुटुंबांना संरक्षण दिले आहे.

  OCW स्थानिक व्यवसायांना व पुरवठादारांना अधिकाधिक संधी देण्यासाठी कटिबद्ध आहे. आपल्या कामांत शक्य त्या प्रत्येक ठिकाणी स्थानिक व्यवसायांना OCWसंधी देत आले आहे व असाच पाठिंबा पुढेही देत राहील.

  सतत प्रभावी सेवा देण्याच्या दृष्टीने OCW नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांना कौशल्य विकासासाठी प्रोत्साहित करत असते. याची जाणीव कर्मचाऱ्यांना सातत्याने देण्यात येणाऱ्या शिक्षण व प्रशिक्षणातून होत असते. OCW सोबत काम स्थानिक युवकांना भारतीय पाणीक्षेत्रातील एका महत्वाच्या प्रकल्पावर काम करण्याचा व हा प्रकल्प समजून अनुभव मिळालेला आहे.

  प्रत्यक्ष रोजगार निर्मितीच्या संधीसोबतच OCW अनेक NGOs च्या सहकार्याने ‘मॉडेल स्लम डेव्हलपमेंट’ कार्यक्रम राबवत आहे. या अंतर्गत OCW कौशल्य विकास केंद्र “समर्थ सेंटर” हा उपक्रम चालवत आहे. यातून गरीब वस्त्यांमधील महिलांना प्रशिक्षण व त्यातून स्वयंरोजगार अशी दुहेरी संधी उपलब्ध होत आहे. अशी २ केंद्रे शहरात सुरु आहेत. अनेक महिलांना याचा लाभ होत आहे.

  प्रकल्पाची सामायिक सामाजिक ओळख ही OCWच्या ‘सर्वांना पिण्याचे पाणी उपलब्ध करवून देणे’, स्थानिक रोजगाराला चालना देणे, उपजीविकांना आधार आणि समग्र विकासात योगदान या धोरणांमधून स्पष्टपणे परावर्तित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145