Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jan 20th, 2021

  जि. प. हिवरा हिवरी शाळेची वैष्णवी हिंगे आकाशवाणीवर

  शाळेबाहेरची शाळा’ उपक्रम ९९ व्या भागात मुलाखत

  रामटेक-(शहर प्रतिनिधी )कोरोना संकटकाळात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी घेतल्या गेलेल्या मुलाखतीद्वारे रामटेक तालुक्यातील जि. प.डिजिटल उच्च प्राथमिक शाळा हिवरा हिवरी येथील इ. ८वीची विद्यार्थींनी वैष्णवी शेषराव हिंगे हिची आकाशवाणीवर ‘शाळेबाहेरची शाळा’ या उपक्रमात ९९ व्या भागात सहभागी होण्याकरीता नागपूर जिल्ह्यातून निवड झाली असून ही मुलाखत दि.२ फेब्रुवारीला सकाळी १०.३५ वाजता आकाशवाणी नागपूरच्या ‘अ’ (५१२.८) केंद्रावरून प्रसारित होणार आहे.

  कोरोना काळात संपूर्ण जग संकटात सापडल्यामुळे समाजातील सगळेच घटक भरडुन निघालेले असल्याने यास शिक्षण क्षेत्र सुद्धा अपवाद नाही.याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर यांच्या प्रेरणेने, प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर नागपूर यांच्या सहकार्याने, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि जि. प. नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कृतीयुक्त सहशालेय उपक्रमासोबतच ‘शाळेबाहेरची शाळा’ हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत असून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारला अंगणवाडी तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरिता सकाळी १०.३५ वाजता आकाशवाणी नागपूरच्या ‘अ’ (५१२.८) केंद्रावरून प्रसारित केल्या जातात .

  भारतामध्ये ब्रिटिशांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काय सुधारणा केल्या? शालेय अभ्यासाच्या याविषयावर माहिती देण्याकारिता वैष्णवी ची निवड झालेली आहे.

  सदर मुलाखतीत विचारलेल्या शैक्षणिक प्रश्नांची वैष्णवीने मोकळेपणाने उत्तरे दिली असल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात असून रामटेक पं. स. चे गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे मृणाली फुलके, अमोल नाईक तसेच शाळेचे मुख्याध्यापक सचिन चव्हाण,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कीर्ती आकरे, सरपंच सुरेखा मलेवार,उपसरपंच विष्णू काठोके, ग्रामसेवक टी डी पवार,माजी अध्यक्ष नंदू चव्हाण,कमलाकर राऊत,पालक शेषराव हिंगे,श्वेता हिंगे,केंद्रप्रमुख राजकुमार पचारे, शिक्षक संध्या राऊत, शालिक महाजन,संगिता सोनटक्के,रुपाली चटप यांनी अभिनंदन केले.

  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे द्वार किती मोकळेपणाने खुलू शकते,शैक्षणिक क्षेत्रात त्यांची गगणभरारी किती लांब जाऊ शकते. या करीता वैष्णवीची निवड अत्यंत महत्वाची व अभ्यासपूर्ण ठरणारी आहे. भावी आयुष्यात स्पर्धापरीक्षेद्वारे शिक्षिका होण्याचे वैष्णवीचे स्वप्न आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145