Published On : Sun, Sep 26th, 2021

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये रामटेक तालुक्यातील १२९ प्रकरणांचा निपटारा

४६ लक्ष १९ हजार ९५९ रुपयांचा तडजोड करून निपटारा

रामटेक तालुका विधी सेवा समिती व तालुका बार संघ, रामटेक यांचे संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय रामटेक येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमलेल्या पॅनेल समोर दिवाणी फौजदारी (१३८) एन आय अॅक्ट, पतसंस्थाचे दाखल पूर्व प्रकरणे व तसेच ग्रामपंचायतीचे कर व पाणी करांची प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी ५. दिवाणी व ८ फौजदारी प्रकरणे बँकेतील ४८ दाखल पूर्व प्रकरणे तसेच ८१ पाणी व घर करांची प्रकरणे असे एकुण १२९ प्रकरणांतुन एकूण रुपये ४६ लक्ष १९ हजार ९५९ रुपयांचा तडजोड करून निपटारा करण्यात आला

विशेषत्वाने वर्ष १९९२ ची चोरीचे फौजदारी प्रकरण व वर्ष २००५ चे ३ दिवाणी जुने दावे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. प्रकरणातील वयस्कर पक्षकारांनी लोकन्यायालयातील या तडजोडी बाबत समाधान व्यक्त केले.

या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन १३ वे सह दिवाणी न्यायाधिश क स्तर, कोर्ट क ५, नागपुर चे श्री एस .एस जाधव , यांनी केले.
रामटेक तालुका विधी सेवासमितीचे अध्यक्ष व दिवाणी न्यायाधीश क स्तर .व्ही. पी. धुर्वे, तसेच एस. एस.जाधव यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला तालुका वकील संघाचे अध्यक्ष एम. एन. नेवरे, सचिव एम. व्ही. येरपुडे, पॅनेल वर ए. व्ही गजभिये, एम. ए गुप्ता, एस. एस. खंडेलवाल, एच.जी हटवार ,यांचे सह ॲड.संतोष केला तसेच तालुका वकील संघाचे इतर सदस्य हजर होते. या कार्यक्रमाला एस.बी.आय. चे मॅनेजर मोहनसिंग भाटी, युको बँक, बँक ऑफ इंडिया, बैंक ऑफ बडोदा या बँकेचे मॅनेजर बँकेतील कर्मचारी व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उपस्थित होते.

राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रसंगी आलेले प्रमुख पाहुणे , १३ वे सह दिवाणी न्यायाधिश क स्तर, कोर्ट क ५, नागपुर चे श्री एस .एस .जाधव
यांनी लोकन्यायालयाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन आपल्या भाषणात केले. न्यायाधीश व्ही. पी. धुर्वे यांनी आपल्या भाषणात सामंजस्याने वाद मिटविण्यास सहकार्य करावे असे जनतेला आवाहण केले.

त्यामुळे लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणांचा आपसी समझौत्याने निपटारा करावा असा संदेश दिला. या कार्यक्रमाची प्रस्तावना व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन . , सहा अधिक्षक, दिवाणी व फौजदारी न्यायालय रामटेक च्या ए.एम.जोशी यांनी केले.

या कार्यक्रमाला तालुका वकील संघाचे व न्यायालयाचे कर्मचारी सहा. अधिक्षक सौ. ए. एम. जोशी, ए. एम. कोतवार, लघुलेखक सौ. ए. एन. यादव, वरिष्ठ लिपीक सौ. धांडे, के एम वानखेडे, डी. बी पाकडे, एम. एन. घोडमारे, कनिष्ठ लिपीक डी. जी हनवतकर, आकाश येरपुडे, गिरडकर, बेलिफ जी. आर . हाडे , एस. एस. साकुरे तसेच शिपाई , सुरपाम, गोखले. धुळे व सफाईगार . कटारे यांनी सहकार्य केले.