| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jan 14th, 2021

  दत्तवाडी मुख्य मार्गावर जलवाहिनी फुटल्याने स्वच्छ पाण्याची नासाडी

  – तक्रार केल्यावरही अजून पर्यंत कार्यवाही नाही – व्यवसायिक

  वाडी : नगरपरिषद प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरिकांना पाणी हेच जीवन आहे,त्याला वाया घालवू नका अशा प्रकारचे आवाहन दररोज करताना दिसते. परंतु दत्तवाडी च्या मुख्य मार्गावरील व्यवसायिक परिसरात मागील २० दिवसापासून वेणा जलाशयाची जलवाहिनी फुटल्याने स्वच्छ पाणी वाया जात आहे.याबाबत स्थानिक व्यवसायिकांनी रितसर तक्रार करूनही अजून पर्यंत कुठलीही कारवाई झाली नसल्याचे दुकानदारांनी प्रशासन निद्रावस्थेत असल्याचा आरोप केला आहे.

  दत्तवाडी दुकानदार संघटनेचे पदाधिकारी विपिन टेंभुर्णे यांनी सांगितले की,पावडे भवनासमोर पोटे कॉम्प्लेक्स समक्ष वेणाची जलवाहिनी फुटल्याने दररोज स्वच्छ पाणी रस्त्यावर जमा होत आहे,पाण्याची बरबादी तर होतच आहे परंतु येणाऱ्या-जाणाऱ्यांना व ग्राहकांसह व्यावसायिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.जागरूक नागरिकांचे कर्तव्य समजून विपीन टेंभुर्णे सह व्यवसायी राजेश जिरापुरे,चंद्रशेखर येवले, रफीक खान,विक्रांत सांगोळे,भीमराव तायडे इत्यादींनी या समस्येची एक लिखित व मोखिक सूचना वेणा जलवितरण कार्यालय व वाडी नगर परिषद कार्यालय ला देऊन क्षतिग्रस्त जलवाहिनी दुरुस्त करणे व पाण्याच्या नुकसानीवर प्रतिबंधक करण्याचा अनुरोध केला.

  यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाहीचा भरोसा दिला. परंतु २० दिवस लोटुनही या तुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती नगरपरिषद अथवा जीवन प्राधिकरण द्वारा न झाल्याने दररोज स्वच्छ पाणी रस्त्यावर वाहत आहे.याला पाहून समस्याग्रस्त नागरिकांनी या दोन्ही संस्थांनांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

  व जनतेला उपदेश देण्याच्या आधी आपले कार्यातून आदर्श निर्माण करण्याची प्रतिक्रियाही दिली. तातडीने कार्यवाहीची मागणणी या व्यवसायी व पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमां समक्ष व्यक्त केली.आता वाडी नगरपरिषद अथवा वेणा कार्यालय यापैकी कोणते प्रशासन तातडीने कारवाई करून जनते समक्ष उत्तम उदाहरण प्रस्तुत करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145