| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 7th, 2020

  अपघाताने आधारस्तंभ हरवला दुःखाच्या सावटात अंत्यसंस्कार

  बेला: कापडाचे प्रतिष्ठित व्यापारी रामचंद्र रोडे त्यांचा एकुलता एक मुलगा निखिल (19 वर्ष) याचे ट्रॅक्टर दुचाकीच्या धडकेत आकस्मिक दुःखद निधन झाले. 6 वर्षांपूर्वी त्रिवेणी नामक मुलगी आकस्मिक दगावली त्यानंतर तारुण्याचे उंबरठ्यावरील मुलाचे ही ही अकाली निधन झाले. त्यामुळे रामचंद्र भारती रोडे या दाम्पत्याचा मुख्य आधारस्तंभ कोसळला. आकस्मिक निधनाची ही वार्ता गावात येताच वाऱ्याचे वेगाने बेला येथे दुखाचे सावट पसरले.

  रविवारी सायंकाळी 6 वाजता च्या सुमारास निखिल व वैभव हे दोघे चुलत भावंड दुचाकीने( एम एच 40 बीपी 34 15) बुटीबोरी वरून बेला गावाकडे येत होते. चिमणा झरी महामार्गावर असताना मागाहून आलेल्या भरधाव अज्ञात ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये निखिलचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला वैभव जखमी झाला व बेशुद्ध पडला अपघाताची माहिती होताच अनेक आपण त्यांनी घटनास्थळी धाव घेतली .

  सोज्वळ सुंदर दिसणारा निखिल बारावी पास झाला होता . व दुकानात बसून वडीलास मदत करीत होता . त्याची दुःखद निधन गाने अनेकांना शोक अनावर झाला होता .बेला पोलीस स्टेशनचे जमादार अजय चौधरी यांनी जखमीस उपचारार्थ तर मृत का स शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केले अपराध क्रमांक 264 /2020 कलम 279,304 ,337 अन्वये बेला पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अज्ञान ट्रॅक्टर व चालक आरोपीचा तपास सुरू आहे .सोमवारला असंख्य लोकांचे उपस्थि ती त निखिल वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुकानदारांनी संपूर्ण दिवसभर बाजारपेठ बंद ठेवून शोक पाळला व श्रद्धांजली अर्पण केली.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145