Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Mon, Dec 28th, 2020

    प्लास्टिक पतंग, नॉयलॉन मांजाविरोधात मनपाची कारवाई, पाच हजारांचा दंड वसूल

    नागपूर : संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजाविरोधात कारवाईसाठी मनपाने कंबर कसली आहे. सोमवारी (ता. २८) तीन झोनमध्ये केलेल्या पाच कारवाईच्या माध्यमातून सुमारे पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

    प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत एकीकडे जनजागृती होत असतानाच बाजारात काही व्यापारी त्याची विक्री करीत आहे. मनपा आयुक्तानच्या आदेशानुसार, अशा व्यापाऱ्यांवर मनपातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारी (ता. २८) लक्ष्मी नगर झोनअंतर्गत एक, सतरंजीपुरा झोनअंतर्गत दोन आणि आशीनगर झोनअंतर्गत दोन कारवाई करण्यात आल्या.

    या माध्यमातून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. २२५ नग प्लास्टिक पतंग जप्तीची कारवाईही करण्यात आली.

    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145