| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Dec 22nd, 2020

  हिंगणा माउंट व्ह्यू डेपो” चे उर्वरित कार्य गतीने पूर्ण करा: डॉ. दिक्षित

  – ६५ एकर परिसरात ऍक्वा लाईन मार्गिकेवरील मेट्रो डेपो

  नागपूर – महा मेट्रोचे निर्माण कार्य रिच – २ आणि रिच ४ येथे जलदगतीने सुरु असून ऑरेंज लाईन व ऍक्वा लाईन मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा सुरु आहे. या दोन्ही मार्गिकेवर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनचे रखरखाव व दुरुस्तीचे कार्य मिहान आणि हिंगणा माउंट व्ह्यू डेपो येथे केले जाते. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आज “हिंगणा माउंट व्ह्यू डेपो” ची पाहणी केली. पाहणी दरम्यान डॉ. दीक्षित यांनी उर्वरित निर्माण कार्य जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्याना दिले.

  हिंगणा मार्गावर ऍक्वा लाईन मार्ग डेपोचे क्षेत्रफळ ६५ एकर परिसरात असून ३०.१९ एकर क्षेत्रात रोलिंग स्टॉक रखरखावचे कार्य केल्या जाणार आहे. तसेच उर्वरित परिसरात सुरक्षा रक्षक ऑफिस, ऑटो कोच वॉश प्लांट, ट्रॅकशन सब स्टेशन, ऑसिलरी सब स्टेशन, अंडर ग्राउंड पंप रूम, मेंटेनस बिल्डिंग, पिठ व्हील लेंथ, इंजिनीअरिंग ट्रेन युनिट, इंटर्नल क्लिनिंग प्लॅटफॉर्म, अनलोडींग प्लॅटफॉर्म, स्टेबलिंग लाइन आणि बायोडायजस्टर प्रणाली राहणार आहे. हिंगणा डेपो येथे एका वेळेस १७ मेट्रो ट्रेन ठेवता येत असून सध्या ०९ मेट्रो ट्रेन या ठिकाणी ठेवण्यात आले आहे व मिहान डेपो येथे ०८ मेट्रो ट्रेन ठेवण्यात आल्या आहेत .

  मेट्रो डेपो येथे ट्रेनची साफ सफाई करिता डेपो परिसरात आटोमेंटिक ट्रेन वॉशिंग प्लांट लावण्यात आला आहे. दररोज सकाळी ट्रेनचे परिवहन होण्यापुर्वी मेट्रो ट्रेन धुण्याचे काम या प्लांट मध्ये केल्या जाते. रात्री ट्रेन डेपो मध्ये पोहोचल्या नंतर परत एकदा धुतल्या जाते. आटोमेंटिक वॉशिंग प्लांटचे संचालन प्रोग्राम कंट्रोल पैनल द्वारे केल्या जाते. यामध्ये फोटो इलेक्ट्रिक सेंसॉर आणि सेल्स इत्यादी उपकरण लावण्यात आले आहे. कुठल्याही लांबीच्या ट्रेन याठिकाणी धुऊन स्वच्छ करून साफ सफाई या ठिकाणी केली जाते. फक्त ३ मिनिटाच्या अल्पावधीतच तीन कोचच्या ट्रेनची संपूर्ण सफाई होत धुतल्या जाते. ट्रेनचे धुण्याचे कार्य स्वयंचलित असल्याने कमी वेळ आणि खर्चात हे कार्य होते.

  सदर प्लांट मध्ये १००% रिसाईकलिंग वाटरचा उपयोग केल्या जात आहे. प्लांट मध्ये ट्रेन धुण्याच्या वेळी ट्रेनची स्पीड ३ किलोमीटर प्रति तास ठेवल्या जाते. ३ मिनिटाच्या कालावधी मध्ये ट्रेन च्या तीनही कोचला प्लांट मधील रुळाच्या दोन्ही बाजूने लागलेल्या ब्रशने सहज साफ करून देतात. कुठल्याही आकस्मिक परिस्थिति उदभवल्यास ब्रश आपले कार्य करने त्वरित बंद करते. कुठलीही तांत्रिक अडचण आल्यास आटोमेंटिक वॉशिंग प्लांटचे संचालन तेथील कर्मचाऱ्यांच्या माध्यमाने देखील केल्या जाऊ शकते. वीज आणि पाण्याचा वापर अतिशय कमी होतो. प्लांटचे संचालन डेपो कंट्रोल सेंटर येथून केल्या जाते. कंट्रोल पैनल द्वारे ट्रेन च्या दोन्ही बाजूने साफ-सफाई केली जाते. प्लांट मध्ये कुठलीही आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास प्लांट स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमाने बंद होतो.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145