Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Dec 8th, 2020

  ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ ला नागरिकांचा प्रतिसाद

  – आता घर बसल्या करा सेलिब्रेशन ऑन व्हील्सची बुकिंग,धावत्या मेट्रोत फक्त ३०००/- रुपयात करा वाढदिवस, प्री-व्हेंडिंग शूट,लग्नाचा वाढदिवस साजरा

  नागपूर – महा मेट्रोतर्फे नागरिकांन करता सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ अनोखी योजना आखण्यात आली असून फक्त ३००० रुपये मध्ये वाढदिवस, प्री-व्हेंडिंग शूट, लग्नाचा वाढदिवस व इतर कार्यक्रम साजरा करू शकतात. `सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ या अनोख्या योजनेंतर्गत नागपूरकरांची पसंती मिळत असून या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ही योजना सर्वांकरिता खुली असून नागरिक तसेच इव्हेंट ऑर्गनायझर देखील याचा लाभ घेऊ शकतात. ३ कोचच्या मेट्रो मध्ये कोरोना पार्श्वभूमीमुळे जास्तीत जास्त फक्त १५० व्यक्ती आमंत्रित करता येईल व १ तासा करिता फक्त रु. ३ हजार मोजावे लागतील तसेच अतिरिक्त वेळ करिता रु.२ हजार प्रति तास द्यावे लागतील ज्यामध्ये मेट्रो कोचला आकर्षक पद्धतीने सजविण्यात येईल.

  घर बसल्या करा सेलिब्रेशन ऑन व्हील्सची बुकिंग सेलिब्रेशन ऑन व्हील्सला नागरिकांचा मोठ्या प्रमाणता प्रतिसाद मिळत असून आता घर बसल्या देखील सेलिब्रेशन ऑन व्हील्सची बुकिंग करने शक्य झाले आहे. या करता महा मेट्रोने नागरिकांन करीता मोबाईल नबंर उपलब्ध करून दिला असून बुकिंग अथवा कुठल्याही शंका करिता ७८२७५४१३१३,८३०४१८०६५,९३०७९०११८४ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच महा मेट्रोच्या अधिकृत वेबसाईट येथे देखील बुकिंग करू शकतात.

  सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ मधील नियम व सोई सुविधा
  (१.) ३ कोचची एक मेट्रो (२.) फक्त १५० व्यक्ती आमंत्रित करता येईल (कोरोना पार्श्वभूमीमुळे) (३.) स्टेशन येथे वेलकम अनांउन्समेंट, (४.) फ्लेक्स/बॅनर्स (५.) फोटो व व्हिडीयोग्राफी (६.) केक कटिंग (सुरक्षेअभावी मेणबत्तीचा उपयोग करता येणार नाही) (७.) बंद डबा असलेले रिफ्रेशमेंट (८.) मेट्रो तर्फे ट्रेन मध्ये हाऊसकिपींग स्टाफ (९.) कोविड – १९ च्या सर्व नियमावली पाळणे आवश्यक (१०.) ७ दिवसापूर्वी करावी मेट्रो भवन येथे बुकिंग करणे आवश्यक.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145