| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 8th, 2021

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

  नागपूर : विदर्भासाठी वरदान असणाऱ्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी सव्वादहा वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.

  यापूर्वी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची अमरावती जिल्ह्यामध्ये पाहणी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान असणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी त्यांचे आगमन झाले आहे.

  भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पासोबतच ते लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी प्रकल्पातील कालव्यावरील नॅशनल हायवे क्रॉसिंगची पाहणी करणार आहेत.

  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत प्रधान सल्लागार अजोय मेहता उपस्थित होते. आज सकाळी विमानतळावर आमदार किशोर जोरगेवार, आमदार आशिष जयस्वाल यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (एनएमआरडीए ) महानगर आयुक्त शीतल तेली- उगले, नागपूर शहर सहआयुक्त सुनील फुलारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, पोलीस अधीक्षक नागपूर गामीण राकेश ओला, पोलीस उपायुक्त सारंग आवड, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर, भारतीय विमान प्राधिकरणचे उपमहाप्रबंधक सुभाष प्रजापती आदी उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145