| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jan 6th, 2021

  मनपा मध्ये पत्रकार दिन साजरा

  नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षामध्ये मराठीचे पहिले वर्तमानपत्र “दर्पण” सुरु झाल्याचे निमित्ताने पत्रकार दिन मोठया उत्साहाने बुधवारी (६ जानेवारी) ला साजरा करण्यात आला. यावेळी निर्वाचित महापौर श्री. दयाशंकर तिवारी, स्थायी समिती सभापती श्री.विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेता श्री. संदीप जाधव, प्रतोद श्रीमती दिव्या धुरडे यांनी मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

  या प्रसंगी पत्रकारांना ” पत्रकार दिनाच्या” शुभेच्छा देतांना श्री. दयाशंकर तिवारी म्हणाले की, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मोठया हिमतीने मराठी वर्तमानपत्र “दर्पण” काढून इंग्रजांच्या विरुध्द स्वातंत्रयासाठी आंदोलन करण्यासाठी नागरिकांना जागृत केले. त्यांना मराठी पत्रकारितेचा ‘भीष्म पितामह’ ही संबोधल्या जाते. “दर्पण” वर्तमानपत्र इंग्रजांना दाखविणारा “आरसा” होता. आजच्या पीढीनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. हिंदी पत्रकारितेमध्ये जसे गणेश शंकर विद्यार्थी होते तसेच मराठी पत्रकारितेमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे स्थान आहे.

  यावेळी पत्रकार कक्षाचे अध्यक्ष राजेश चरपे, गणेश हुड, रवि गजभिये, ललेन्द्र करवाडे, महेन्द्र भुसारी, सिध्दार्थ रामटेके, समीर पठान, राजीव सिंग, सागर मोहोड, अमित वांढरे, डॉ.ममता खांडेकर, नीरज दुबे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी व सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस आदी उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145