| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 2nd, 2020

  भाजपा राष्ट्रीय महामंत्री सी.टी.रवी यांनी दिली दीक्षाभूमीला भेट

  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन : भाजपा नागपूर शहरतर्फे स्वागत

  नागपूर : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री तसेच प्रदेश प्रभारी तथा कर्नाटकचे आमदार सी.टी.रवी यांनी बुधवारी (ता.२) दीक्षाभूमी येथे भेट दिली. दीक्षाभूमीवर त्यांनी तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केली. दीक्षाभूमी स्तूपामधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेत सी.टी.रवी यांनी वंदन केले.

  भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री तसेच प्रदेश प्रभारी तथा कर्नाटकचे आमदार सी.टी.रवी बुधवारी (ता.२) नागपूर शहर संपर्क भेटीवर आले होते. दीक्षाभूमी परिसरात भाजपा नागपूर शहर कार्यकारिणीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, भाजपा प्रदेश सचिव तथा मनपा विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम, कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर, मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जाधव, अनु. जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोकजी मेंढे, शहर भाजपा अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष राजेश हाथीबेड, माजी आमदार डॉ.मिलींद माने, ॲड.राहुल झांबरे, सुभाष पारधी, सतीश शिरसवान, भैयाजी बिघाणे , रोहन चांदेकर, जयप्रकाश गुप्ता, शंकर मेश्राम, चंद्रशेखर केळझरे, राजू चव्हाण, अतुल सुखदेवे, अजय करोसिया, आदर्श वासमकर, रणजीत गौर, अमित गांजरे, धनंजय कांबळे, शुभम पाटील, विकास मेश्राम, सुनील वाहने, वैशाली हानवते, प्रभाकर मेश्राम, कला बावणे, प्रेमा शेंडे यांच्यासह बहुसंख्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

  नागपूर शहर हे देशाच्या हृदयस्थानी आहे. मात्र या शहरात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेउन हे शहर आमच्याच हृदयात वसवले आहे, अशी भावना यावेळी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री, प्रदेश प्रभारी तथा कर्नाटकचे आमदार सी.टी.रवी यांनी व्यक्त केली.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145