कच-यापासून बायो सीएनजी प्रकल्प
महापौरांची वृंदा ठाकुरसोबत चर्चा
नागपूर : सुप्रसिध्द निसर्ग प्रेमी श्रीमती वृंदा ठाकुर यांनी सोमवारी (२५ जानेवारी) ला महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांची भेट घेतली. यावेळी सत्तापक्ष नेते श्री. संदीप जाधव ही उपस्थित होते.
श्रीमती ठाकुर यांनी नीदरलँड मध्ये कच-यापासून बायो सीएनजी तयार केले आहे. कच-यापासून बायो सीएनजी तयार करण्याचे त्यांच्या प्रकल्पाला विरार महानगरपालिकामध्ये मंजूरी प्राप्त झाली आहे. या प्रकल्पामध्ये कच-याचा विलगीकरण करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी नागपूर महानगरपालिकेला हा प्रकल्प सुरु करण्यासाठी निवेदन दिले.
महापौर श्री. तिवारी यांनी प्रकल्पाबददल विस्ताराने समजून घेतले. त्यांनी अधिका-यांसोबत चर्चा करुन नागपूर मधून कच-याचे विल्हेवाट करण्यासाठी हया प्रकल्पाचा अवश्य विचार करु असे आश्वासन दिले.