| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 23rd, 2020

  सायकल आणि मेट्रो प्रवास हाच खरा आरोग्याचा मन्त्र

  – शहरातील डॉक्टरांनी केला सायकलीसह मेट्रोने प्रवास

  नागपूर– महा मेट्रो तर्फे प्रवाशांच्या सुविधेकरिता अनोखे उपक्रम राबवले जात आहेत. मेट्रो ट्रेन मध्ये सायकल ने प्रवास, सेलिब्रेशन ऑन व्हील योजना राबवणे, मेट्रो स्थानकावर फिडर सर्व्हिस देणे सारख्या उपक्रमांच्या माध्यमाने प्रवाश्यांकरीता विविध सोयी मेट्रो तर्फे दिल्या जात आहेत. मेट्रो ट्रेनमध्ये सायकल नेण्यासारख्या उपक्रमाला तर नागपूरकरांनी भक्कम पाठिंबा दिला असून आता रोज मेट्रो ट्रेनमध्ये सायकलीसह नागपूरकर प्रवास करताना दिसत आहेत.

  मेट्रो ट्रेन मध्ये सायकलसह प्रवास करण्याच्या या उपक्रमाला सर्व सामान्य जनतेसह शहरातील नावाजलेल्या डॉक्टरांनी देखील भरघोस प्रतिसाद दिला आहे. नित्य नेमाने सायकल चालवत स्वतःला फिट ठेवणाऱ्या या डॉक्टरांनी खापरी मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान मेट्रोतुन सायकल सह प्रवास करत एक वेगळाच अनुभव घेतला. मेट्रोच्या माध्यमाने सायकलसह प्रवास करण्याच्या या उपक्रमात नागपुरातील डॉ रम्या निसळ, डॉ शैलेश निसळ, डॉ धनंजय बोकारे, डॉ राजेश सिंघवी आणि डॉ किरण बेलसरे या निष्णात डॉक्टरांनी सहभाग घेतला.

  मेट्रोचा सायकलसह केलेला हा प्रवास आपल्याकरिता अतिशय अनोखा होता असे मत डॉ रम्या निसळ यांनी व्यक्त केले. मेट्रो गाडीतून सायकल नेण्याचा हा प्रयोग अतिशय आपल्याला रुचल्याचे डॉ निसळ म्हणाल्या. मेट्रोने प्रवास करताना नागपूरचे विहंगम दृश्य बघायला मिळते, असे हि त्या म्हणालात. सायकलने प्रवास करणे शारीरिक दृष्टया लाभदायक असून सायकल आणि मेट्रो – या दोन साधनांचा उपयोग करत प्रवास करणे हे आरोग्याकरिता लाभदायक असल्याचे डॉ किरण बेलसरे म्हणाले.

  *मेट्रो आणि सायकल -* या दोन्हीही साधनांनी प्रवास करताना प्रदूषण होत नसून हा एक महत्वाचा मुद्दा असल्याचे मत पेश्याने सर्जन असलेले आणि पर्यावरणा संबंधी विषयांशी जिव्हाळा असलेले डॉ राजेश सिंघवीम्हणाले. या सर्व बाबींचा विचार करत नागपूरकरांनी शहरात प्रवास करताना या दोन्हीही साधनांचा वापर अधिकाधिक प्रमाणात करावा असे आवाहन देखील या सर्व मान्यवर डॉक्टरांनी या प्रसंगी केले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145