Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Fri, Dec 11th, 2020

    बजेरीयामध्ये समाजभवन बांधकामाचे भूमिपूजन

    ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या प्रयत्नाने ४० लक्ष रूपये निधी मंजूर

    नागपूर: गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ मधील बजेरीया वार्ड येथे गुरूवारी (ता.१०) समाजभवन बांधकामाचे मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, आमदार गिरीश व्यास, मनपा स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

    बजेरीया येथे समाजभवन बांधकामासाठी स्थानिक नगरसेवक दयाशंकर तिवारी मागील अनेक महिन्यांपासून प्रयत्नरत होते. त्यांच्या प्रयत्नातून समाजभवनासाठी ४० लक्ष रूपये निधी मंजूर झाले. समाजभवन कार्याच्या भूमिपूजन प्रसंगी मध्य मंडल अध्यक्ष किशोर पालंदुरकर, माजी नगरसेवक कृष्णा कावडे, गांधीबाग झोन चे कनिष्ठ अभियंता श्री फडाके, विनायक डेहनकर, अनिल मानापूरे, राजू धकाते, ब्रजभूषण शुक्ला, सुनील श्रीवास, अमोल कोल्हे, अजय गौर, मंदाताई पाटील, जयंत तेलंग, विनय पाठक, राकेश असाटी, महेश चक्रधर, राधेश्याम साहू, नयन साहू, श्रवण साहू, श्यामसिंह बैस, शैलेंद्र बावरिया, विक्की प्रजापती, सुजान शर्मा, प्रशांत गौर, प्रवीण श्रीवास, सुनील यादव, हेमंत महुले, भारतीबेन शाह, ज्योती वर्मा, अनूप गोमासे, रमाकांत गुप्ता, अजय टक्कामोरे, महेश कुकरेजा, अंकित साहू, गोकुल प्रजापती, शैलेंद्र ठाकुर, सुरेश श्रीवास्तव, राहुल बहोरिया, दुर्गेश प्रजापती, सिद्धार्थ जोशी, चंदू देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

    बजेरिया येथील निवासी नागरिकांच्या सार्वजनिक सुविधेसाठी परिसरात समाजभवन व्हावे, याबाबत मागील अनेक दिवसांपासून स्थानिक निवासींची मागणी होती. सदर परिसरात नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने समाजभवनासाठी जागेची उपलब्धता आणि त्याबाबत अनेक अडथळे होते. मात्र स्थानिक नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी यामधीला सर्व अडथळे दूर नागरिकांसाठी समाजभवन साकारण्याचा मार्ग मोकळा केला, अशा शब्दांमध्ये आमदार गिरीश व्यास व आमदार विकास कुंभारे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145