| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Dec 8th, 2020

  शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कृषी कायद्यांविरोधात “भारत बंद” ला आप चा पाठिंबा

  सीताबर्डी मध्ये ‘भारत बंद’ ला चांगला प्रतिसाध

  आज दिनांक ८ डिसेंबर २०२० मंगळवार ला आम आदमी पक्षातर्फे सकाळी ११ वाजता सीताबर्डी येथे केंद्र सरकारच्या नवीन तीन कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील ३५ शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंद ला पाठींबा देण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सक्रियपणे सहभाग घेऊन आणि निदर्शने करून सीताबर्डी येथील व्यावसायिकांना, व्यापारी संघटनांना नम्रपणे निवेदन करून , त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याकरिता आवाहन करण्यात आले तसेच आपली प्रतिष्ठाने, दुकान बंद ठेवून शेतकऱ्यांच्या दिल्ली येथील आंदोलनाला समर्थन करण्याविषयी सांगण्यात आले त्यावर व्यापाऱ्यांनी सुद्धा तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद करून भारत बंद मध्ये शांततेने सहभागी झालेत. सीताबर्डी येथील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आणि सहभागी होऊन समर्थन केले. तसेच समाजातील इतरही घटकांनी या बंदमध्ये सामील व्हावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले.

  ह्या भारत बंद च्या आंदोलन विधर्भ संयोजक व राज्य समिति सदस्य देवेंद्र वानखेड़े, राज्य कोषाद्यक्ष जगजीत सिंघ, नागपुर संयोजक कविता सिंघल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय कॉउंसिल सदस्य अमरीश सावरकर, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, नागपुर सहसंयोजक प्रशांत निलाटकर, दक्षिण पश्चिम संयोजक अजय धर्मे, पश्चिम संघटन मंत्री हरीश गुरबानी, रोशन डोंगरे, दिलीप बिडकर, रजनी शुखला, विश्वजीत मसराम, हेमंत बनसोड, राजेश भोयर , मयंक यादव, राकेश अंबोडे, रवींद्र घिडोडे, शिरीष तिडके, पुष्पा डाबरे, नागसेन शेंडे, सहरुख शेख, प्रवेश लांडगे, कृताल वेलकर, पियुश आकारे, डॉ जाफरी जी, गिरीश तितरमारे, शालिनी अरोरा, मीना भोयर, अशोक लोधम, चंद्रशेखर लोखंडे, अमोल हाडके, अलका पोपटकर, लक्ष्मीकांत दांडेकर, मॉन्टी मुठकरे, शिवम काकडे, बंटी ढोले, राहुल कावळे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145