Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Dec 11th, 2020

  ‘बॅन गंगा-जमुना’ मोहिम: गंगा जमूना वस्तीतून आठ अल्पवयीन मुलींची सुटका, नागपूर पोलिसांच्या कारवाईचे स्वागत

  नागपूर: इतवारी भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या सहकार्याने ‘बॅन गंगा-जमुना’ मोहिम राबविण्यात येत आहे, या मोहिमेंतर्गत गंगा जमूना वस्तीत चोरी-छुपे सुरू असलेल्या देह व्यवसाय रोखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना विनंती करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर गुरुवार, दिनांक १० डिसेंबर रोजी नागपूर पोलिसांतर्फे करण्यात आलेल्या कारवाईत गंगा जमूना वस्तीतून आठ अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली, याचे ‘बॅन गंगा-जमुना’ मोहिमेतील सक्रिय सदस्य आणि स्थानिय नागरिकांनी स्वागत केले. यापूर्वी सुद्धा या ठिकाणी नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होतांना आढळले आहे, एवढच नव्हे तर या परिसरातून मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलींची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

  श्री गजानन राजमाने, डीसीपी (गुन्हे शाखा)आणि श्री लोहित मतानी, झोनल डीसीपी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या कालच्या कारवाईत पोलिसांनी तब्बल १२९ जणांना अटक केली. ऑक्टोबर महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईतून इतर जिल्ह्यातील गंगा जमूना वस्तीत आणण्यात आलेल्या १४ मुलींची सूटका करण्यात आली होती.

  राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार महिलांवरील गुन्ह्यांसाठी नागपूर देशात सातव्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात दररोज साधारणतह: १०५ महिला बेपत्ता होत आहेत. महाराष्ट्रात तर दर आठवड्याला १७ महिलांची तस्करी होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंस) पीड़ित मुलींमध्ये ४७% मुलींचे यौन शोषण तर ४८% मुलींचे लैगिंग शोषण होत आहे.

  सुनील गोटाफोडे, सामाजिक कार्यकर्ता: पोलिसांच्या अशा धाडसी कारवाईचे आम्ही स्वागत करतो. रेड लाईट एरिया असल्यामुळे गंगा जमुना व आसपासच्या अशा गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षांपासून लढा देत आहोत. हा परिसर वेगाने सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचा, विशेषत: महिलांवरील अत्याचाराचा प्रमुख केंद्र बनत आहे. यापूर्वी पोलिसांनीही अशा प्रकारचे अनेक छापे टाकले आहेत, यात पोलिसांना यश ही आले आणि यासाठी आम्ही पोलिसांतर्फे होत असलेल्या कारवाईचे स्वागत करतो.

  भूमिका गोटाफोडे, सामाजिक कार्यकर्ता: आम्हाला भीती आहे की साथीच्या रोगानंतर अधिकाधिक मुली देह व्यापारात ढकलले जातील. दारिद्र्य आणि बेरोजगारीमुळे विदर्भातील मुली व तरुण स्त्रिया सर्वाधिक असुरक्षित आहेत. शहरातील मुलीही असुरक्षित आहेत. तस्करी व इतर गुन्हेगारीला प्रभावीपणे आळा घालण्यासाठी आम्ही रेड-लाइट क्षेत्र व इतर केंद्र याठिकाणी होणाऱ्या मुली व स्त्रियांचे शोषण कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी करतो. देह व्यवसायाशी संबंधित मुलींचा सुटका झाल्यानंतर पुढे त्यांचे काय होईल यावर माझ अस मत आहे की, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे महत्वाचे आहे. अश्या मुलींच्या पुनर्वसनसाठी आवश्यक काम होणे गरजेचे आहे. या मुलींना व महिलांना नवे जीवनदान मिळावे व ते आपल्या पायावर उभे राहू शकेल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145