| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 21st, 2020

  आरएसएस नावाचा गैरवापर कशासाठी ?; सहकार सहायक निबंधकांची नोटीस

  Gavel, Court

  Representational Pic

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप करीत सहकार सहायक निबंधकांनी जनार्दन मून यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

  जनार्दन मून यांनी आरएसएस नावाची संघटना नोंदविण्यासाठी सहकार सहायक निबंधकांकडे अर्ज केला होता. त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतरही त्या नावाचा गैरपवार करण्यात येत असल्याने कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस मून यांना बजाविण्यात आली आहे. आरएसएस या नावाने संघटना नोंदणीस नकार देण्यात आल्यानंतर मून यांनी त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर आव्हान दिले होते. ही याचिका २१ जानेवारी २०१९ रोजी फेटाळण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मून यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तिथेही याचिका फेटाळण्यात आली होती.

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने संघटना नोंदणीकरिता सहकार निबंधक ते सर्वोच्च न्यायालय सगळ्यांनी मून यांचा अर्ज फेटाळला असतानाही त्यांनी त्याच नावाने काही कार्यक्रम आयोजित करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे सहकार सहायक निबंधकांनी नमूद केले आहे. मून यांच्याकडून हेतूपुरस्तर आरएसएस नावाचा गैरवापर होत असल्याने त्यांच्याविरूद्ध दीपक बरड आणि प्रशांत बोपर्डीकर यांनी तक्रार केली. तेव्हा सहायक सहकार निबंधकांनी मून यांना नोटीस बजावित ३० डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याच आदेश दिला आहे. अर्जकर्त्यांच्यावतीने अॅड. गणेश अभ्यंकर यांनी बाजू मांडली.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145