Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 14th, 2020

  जीएसटी कायद्यातील सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल : ॲड. धर्मपाल मेश्राम

  जीएसटी कायद्यातील अलिकडील सुधारणा विषयावर चर्चासत्र

  नागपूर: देशातील नवीन कर प्रणाली जीएसटी कायद्यातील सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचेप्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.

  इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्न्ट ऑफ इंडिया नागपूर ब्रँच ऑफ वेस्टर्न इंडिया रिजनल कौंसिल च्या वतीने आयोजित चर्चासत्रामध्ये बोलत होते. शनिवारी धंतोली येथील आयसीएआय भवन येथे जीएसटी कायद्यांतर्गत सद्यस्थितीतील विकास विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. जीएसटी कायद्यातील अलीकडील सुधारणा ह्या विषयावर प्रमुख वक्ता सीए रितेश मेहता ह्यांनी अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. अध्यक्षस्थानी नागपूर चॅप्टर चे अध्यक्ष सीए किरीट कल्याणी उपस्थित होते.

  पुढे बोलताना ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले, आजच्या घडीला देशात वेगवेगळे मार्ग काढून, शक्कल लढवून कर चोरी केली जाते. विविध प्रकारचे घोटाळे उघडकीस येत आहेत. अशा स्थितीत सीए ची भूमिका आणि जबाबदारी मोठी आहे. आपल्या योगदानामुळेच देश विकासाचा टप्पा सर करत आहे.

  स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही देश विकसनशील आहे. भारतासह अनेक इतरही देश स्वतंत्र झाली. ते देश आज विकसीत राष्ट्र म्हणून उदयास आले आणि आपण आजही विकसनशीलतेच्या स्थितीमधून योग्यरित्या पुढे आलेलो नाही. यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे ध्येय व्यक्त केले आहे. हे ध्येय गाठताना आपल्यातील त्रुटी, अडचणी, अडथळे व तियात मर्यादा येत असल्याचे आज दिसून येत आहे. अशा स्थितीत देश निर्माणासाठी, देशाला एका उंचीवर नेण्यासाठी आपले योगदान कसे असावे, याचे मुल्यमापन करण्याची गरज आपल्यामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

  देशाला मोठे करण्यासाठी, अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी, कर प्रणाली सुस्थितीत आणण्यासाठी आणि पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी देशातील ठराविक लोकांनीच नाही तर देशाचा नागरिक असलेल्या प्रत्येकाला जमीनीस्तरावर काम करण्याची गरज आहे. देशाचा नागरिक म्हणून देशाच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहेत. त्यावर खरे उतरण्यासाठी, देश निर्माणासाठी आपले प्रत्येकाचेच योगदान असावे, अशी अपेक्षाही ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी व्यक्त केली.

  कार्यक्रमाचे प्रसंशनीय आयोजन सीए साकेत बागडीया, सीए संजय अग्रवाल, सीए अक्षय गुल्हाणे, सीए जीतेन सगलानी, सीए सुरेन दुरागकर, सीए हरीश रंगवानी ह्यांनी केले होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145