धुळे आणि नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल विजयी
धुळे : धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपच्या अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अमरीश पटेल यांना 332 तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना 98 मतं मिळाली आहेत. धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या पोटनिवडणुकीत 434 पैकी 4 मतं बाद झाली तर 430 मतं वैध ठरली. 216 प्रथम प्राधान्याची मतं घेणारा उमेदवार जिंकणार असं गणित होतं. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांनी 332 मतं घेत पाटील यांच्यावर विजय मिळवला आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.