कोरोनाकाळात विविध आघाड्यांवरील योद्धांचा गौरव.
अजित पारसे यांचा सत्कार करतांना माझी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोबत उदय भास्कर नायर
नागपूर: कोरोना काळात वैद्यकीय, पोलिस, स्वच्छता आणि सोशल मिडियातून नागरिकांत आत्मविश्वास कायम ठेवणाऱ्यांचा नुकताच गणराज्यदिनानिमित्त गौरव करण्यात आला. माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांंनी कोरोनाकाळातील योद्धांच्या कार्याची इतिहासात नोंद होईल, असे नमुद केले.

यावेळी डॉक्टर, नर्स यांच्यासह हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजिस्ट, रेडीओलॉजिस्ट, देखभाल, दुरुस्ती करणारे कर्मचारी, सफाई कर्मचारी, बजाजनगर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी तसेच कोरोना काळात सोशल मिडियावर जनजागृती करणारे व ‘लॉकडाऊनमधला माझा सोबती` पुस्तक लिहिणारे सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कोरोना काळात डॉक्टरांनी अनेक बाधितांवर उपचार करीत त्यांचे जीव वाचविले. त्याचवेळी हॉस्पिटलच्या स्वच्छतेपासून तर देखभाल करणारे कर्मचारी, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट यांनीही मोठी भूमिका बजावली. याशिवाय पोलिसांनी उत्तम कामगिरी केली. या काळात सरकार व नागरिक तसेच प्रशासन व नागरिकांत संवादासाठी सोशल मिडियाने महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्वांचा गौरव ही अभिमानाची बाब असल्याचे यावेळी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. अनूप मरार यांनी संचालन गणेश अय्यर यांनी केले.