‘लॉकडाऊनमधला माझा सोबती’ ऑडिओ स्वरुपात.
मा.जिल्हाधिकारी ठाकरेंनी केले लोकार्पण.
लोकार्पण करताना मा. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि शेजारी लेखक अजित पारसे , सोशल मिडिया तज्ज्ञ व विश्लेषक.
नागपूर: ‘लॉकडाऊनमधला माझा सोबती` या सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांचे पुस्तक आता ऑडिओ स्वरुपात आले असून मा. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी त्याचे गुरुवारी लोकार्पण केले. लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडियावर उमटललेल्या नागरिकांच्या भावनांचे प्रतिबिंब आता नागरिकांना ऐकता येणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेकजण घरांमध्येच होती तर काहींचे नातेवाईक बाहेर देशात किंवा शहरात होते. कुटुंबातील सदस्यांना पुन्हा परस्परांच्या जवळ आणण्यासाठी सोशल मिडिया मोठा आधार ठरला होता. सोशल मिडियावरून नाते फुलविणारे क्षण असो की पहारा देणारे पोलिसांवर मायेचा हात ठेवणारे नागरिक, सारेच अजित पारसे यांनी ‘लॉकडाऊनमधला माझा सोबती` पुस्तकात शब्दबद्ध केले.
शहरातील स्नेहल शिंदे यांंनी या पुस्तकातील शब्दाला आवाज देत त्याचे ऑडिओ बूक तयार केले. चारुदत्त जिचकार यांनी पुस्तक ऑडिओ स्वरुपात तयार करण्यासाठी स्टुडिओ उपलब्ध करून दिला. कोरोना काळात सामाजाचे भावनिक आरोग्य सोशल मीडियाने सकारात्मक रित्या जोपासून ठेवले. त्याचे तंत्रशुद्ध विश्लेषक पारसे यांनी केले आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मा. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते या ऑडिओ बूकचे लोकार्पण करण्यात आले.
इंग्रजी भाषेत अनेक ऑडिओ पुस्तक उपलब्ध आहे. पण मराठी भाषेत हा विचार त्यामानाने नवीन आहे. आता या पुस्तकाची मजा लुटायला एका जागी बसायची गरज नाही. रस्त्याने चालताना, बसमध्ये बसल्याबसल्या, रात्री झोपी जाताना कुणीही हे पुस्तक www.ajeetparse.com या लिंकवर ऐकू शकता किंवा निःशुल्क डाऊनलोड करू शकता.
– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ज्ञ व विश्लेषक.