| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 8th, 2021
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  सोशल मिडियावर लसीबाबत अफवांचा बाजार ,संभ्रम पसरविण्याची मोहिम: अजित पारसे, सोशल मिडिया तज्ज्ञ व विश्लेषक.

  नागपूर: कोरोनाबाबत अफवा पसरविण्यात आल्याचे अन् त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे अनेक प्रकार पुढे आले होते. आता लसीबाबतही विविध अफवा पुढे येत असून नेहमीप्रमाणे सोशल मिडियावरून संभ्रम पसरविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. काही समाजकंटकांकडून सोशल मिडियाच्या वापरातून अफवांच्या माध्यमातून गोंधळ निर्माण करण्यात येत असल्याचेही चित्र आहे.

  भारतात कोव्हॅक्सीन, कोव्हीशिल्ड या कोरोना लसीच्या आपतकालीन वापराला परवानगी मिळाली आहे. या परवानगीसोबत कोरोना लसीबाबत सोशल माध्यमात विविध अफवा वेगानं पसरत आहेत. पुणे, नाशिकनंतर नागपूर परिसरातंही कोरोना लसीबाबत अफवा पसरल्या जात असल्याचा निष्कर्ष सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी काढला आहे. मुख्य अफवा जश्या, कोरोना व्हॅक्सिनमध्ये डुकराची चरबी आहे, कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिनची प्रभावी आणि सुरक्षित साठवणुकीसाठी डुकराचे मास वापरण्यात आले आहे, स्वित्झर्लँडमध्ये औषध कंपनी नोवाटिरसने डुकराचं मास वापरुन मॅनिंजाईटिस लस तयार केली यासह कोरोना लसीकरण नोंदणीबाबत अफवा आणि यातून फसवणूक, एलर्जी असलेल्या लोकांना लसीकरण, अशा अनेक अफवांच्या पोस्ट सोशल मिडियात दिसून येत आहे.

  एवढेच नव्हे अशा प्रकारचे मॅसेजही फिरत आहेत. नागरिकांत संभ्रम पसरविणाऱ्या अशा मॅसेज, पोस्टवर विश्वास न करता केवळ सरकारी यंत्रणेच्या मॅसेजवर विश्वास करावा, असे आवाहन पारसे यांंनी केले आहे. या मॅसेज, पोस्टवर नागपूर सायबर सेल पोलिसांची नजर असली तरी नागरिकांंनी या काळात अधिक सतर्क राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लसीच्या उपयुक्ततेवर, परिणामकारकतेवर आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने काही अफवा पसरविल्या जात आहे. लसीची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने काही समाज कंटक या परिस्थितीचा गैरफायदा उचलू शकतात. यातूनच अफवा पेरल्या जात असल्याचे पारसे यांनी नमुद केले.

  गेल्या काही दिवसांत सोशल मिडियावर पोस्ट तसेच मॅसेजमधून लसीबाबत अफवा पसरविण्याची मोहिम सुरू आहे. लसीकरण थेट आरोग्याशी निगडित विषय असल्यामुळे गोंधळ उडणार नाही, याबाबत नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे. नागरिकांंनी अफवा पसरवणाऱ्यांबाबतची माहिती पोलीसांना देऊन त्या थांबविणे शक्य आहे.

  अजित पारसे, सोशल मिडिया तज्ज्ञ व विश्लेषक.
  www.ajeetparse.com

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145