Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Dec 18th, 2020
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  मा. नितीनजी गडकरींच्या हस्ते अजित पारसे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन.

  ‘लॉकडाऊनमधला माझा सोबती` पुस्तकाचे प्रकाशन करताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, शेजारी लेखक अजित पारसे, संशोधक डॉ. हेमंत जांभेकर

  नागपूर, ता. १८: लॉकडाउनच्या संकट काळात सोशल मिडियाने नागरिकांची जगण्याची उमेद कायम ठेवलीच, शिवाय अनेकांचा आत्मविश्वासही कायम ठेवला. लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडियावर उमटललेल्या नागरिकांच्या भावनांचे प्रतिबिंब सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी ‘लॉकडाऊनमधला माझा सोबती` या पुस्तकात टिपले. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज सकाळी या पुस्तकाचे प्रकाशन केले.

  केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी पुस्तक प्रकाशन करण्यात आले. यावेळी संशोधक डॉ. हेमंत जांभेकर, अजित पारसे उपस्थित होते. लॉकडाऊनच्या काळात अनेकजण घरांमध्येच होती तर काहींचे नातेवाईक बाहेर देशात किंवा शहरात होते.

  कुटुंबातील सदस्यांना पुन्हा परस्परांच्या जवळ आणण्यासाठी सोशल मिडिया मोठा आधार ठरला होता. सोशल मिडियावरून नाते फुलविणारे क्षण असो की पहारा देणारे पोलिसांवर मायेचा हात ठेवणारे नागरिक, सारेच पारसे यांनी पुस्तकात शब्दबद्ध केले. आजपर्यंत सोशल मिडियाची नकारात्मक चर्चाच पुढे आली. परंतु कोरोना काळात सोशल मीडियाच्या सकारात्मक वापराचा समाजाला कसा फायदा झाला, याचे वर्णन पुस्तकात आहे. कोरोना काळात समाजाचे भावनिक आरोग्य सोशल मीडियाने सकारात्मक रित्या जोपासून ठेवले. त्याचे तंत्रशुद्ध विश्लेषण पारसे यांनी केले आहे. सोशल मीडिया आणि लॉकडाऊनची गुंफण घालणारे हे पहिलेच पुस्तक आहे.

  संवादक्षेत्रात क्रांती करणाऱ्या सोशल मिडियाची सकारात्मक बाजू लोकांपर्यंत पोहोचावी. त्याचा देशाला, समाजाला फायदा व्हावा म्हणून ‘लॉकडाउनमधला माझा सोबती’ हे पुस्तक वाचकांसाठी निःशुल्क वितरित करण्यात येणार आहे.

  – अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145