| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jan 18th, 2021

  नागपूर जिल्ह्यात कटारा- चिपडी -मुसलगाव ग्रामपंचायतीवर आम आदमी पार्टीचा दनदनित विजय.

  नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये नागपूर जिल्ह्यात कुहि तालुक्यात कटारा-चीपडी-मुसळगाव गट ग्राम पंचायत मध्ये ९ पैकी ६ सिट वर आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी गटग्रामपंचायत ताब्यात घेतली,

  या गट ग्रामपंचायत मध्ये ३ गाव मिळून ३/३ असे ९ सदस्य आहेत यापैकी चीपडी गावात श्री सहादेव राजेराम पुडके
  सौ दमयंतीताई अभिमन अडिकणे

  सौ श्रुखंलाताई हेमंत तलवारे हे तीन सदस्य आधीच बिनविरोध निवडून आले आहे तसेच नुकत्याच आलेल्या नीकालात आज कटारा गावातील सौ. हर्षलता बांडेबुचे यांना सर्वाधिक ३२१, श्री. चंदू ठवकर ३१६ व सौ. कविता महाजन यांना ३०४ या प्रचंड बहुमताने विजय प्राप्त केला, एकूणच या ग्रामपंचायत वर ९ पैकी ६ सिट जिंकत नागपुर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत काबीज केली आहे. हा गावातील जनतेचा विजय असून या वीजयाबद्दल आम आदमी पार्टी व निवडून आलेल्या सदस्यांनी गावकऱ्यांचे आभार मानलेत व आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात आदर्श ग्रामपंचायात बनवण्याचा संकल्प घेतला,

  यावेळी वीजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यास आप विदर्भ अध्यक्ष डॉ. देवेंद्र वानखेडे, आप राष्ट्रीय समिती सदस्य श्री. अंबरीश सावरकर, नागपूर जिल्हा ग्रामीण सचिव ईश्वर गजबे, विदर्भ युवा आघाडी संयोजक श्री. पियुष आकरे, राज्य समिती सदस्य कृतल वेळेकर आकरे, कुही तालुका अध्यक्ष श्री. मनोहर चौधरी, श्री.शेखर ढोबळे, मनोज वाहणे सहित मोठ्या संख्येत आप ग्रामीण कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

  आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रतील या पहिल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आता पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायत मध्ये आपचे 22 उमेदवार वीजयी झाले आहेत. या विजयाबद्दल आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्ली चे मुख्यमंत्री मा.श्री. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून वीजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रतिल गावंमध्ये विकासाचे राजकारण करण्याचे आवाहन केले.

  तसेच राज्य अध्यक्ष श्री. रंगाभाऊ राचुरे, राष्ट्रीय प्रवक्त्या श्रीमती प्रीती मेनन, राज्य कोषाध्यक्ष श्री. जगजीत सिंग, राज्य सचिव श्री. धनंजय शिंदे, अशोक मिश्रा, कविता सिंघाल, आप संघटन मंत्री नागपूर ग्रामीण प्रताप गोस्वामी, नागपूर संयोजक गणेश रेवतकर सहित राज्यभरातून सर्व आप नेत्यांनी अभिनंदन केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145