गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्र येथे OCW ने साजरा केला 72 वा प्रजासत्ताक दिन’
Nagpur : 72 वा भारतीय प्रजासत्ताक दिवस Orange City Water (OCW) च्या सर्व कर्मचारी वर्गाने गोरेवाडा जल शुद्धीकरण केंद्र च्या प्रांगणात उत्साहाने साजरा करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजोय रोय ह्यावेळी मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचेच हस्ते ध्वजा रोहण आणि ध्वजवंदना घेण्यात आली.
ह्यावेळी सर्व कर्मचारी वर्गाने “पाणी वाचवा –आयुष्य वाचवा तसेच नागपूर कर ह्यांना शुध्द , सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी कटीबद्ध आहोत हि शपथ घेतली तसेच नागपूरला पाणी समृद्ध करण्याची शपथ घेतली.
संचालक गण श्री लिओनेल, श्री केमंपी सिंघ,श्री राजेश कालरा, उपाध्यक्ष (वित्त) श्री विनोद गुप्ता , उपाध्यक्ष (प्रोजेक्ट ) श्री रज्जीत आय्य्थान, महाप्रबंधक (जलशुद्धीकरण केंद्र) श्री प्रवीण शरण, सुरक्षा प्रमुख श्री प्रकाश महाजन, महाप्रबंधक (ग्राहक सेवा) श्री अमोल पांडे, महाप्रबंधक (समाज सेवा) फरहात क़ुरेशि , श्री अमित गेडाम, श्री मालोय घोष तसेच सर्व झोन प्रबंधक, प्रोजेक्ट प्रबंधक, ग्राहकसेवा प्रबंधक, जलशुद्धीकरण केंद्र प्रबंधक प्रामुख्याने ह्यावेळी उपस्थित होते .
सचिन द्रवेकर ह्यांनी कार्यक्रमाचे संचालन तसेच सर्व कर्मचार्यांना शपथ ग्रहण करविली तर प्रवीण शरण ह्यांनी आभार प्रदर्शन केले.