Published On : Sat, Jul 13th, 2019

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 41 प्रकरणाचा निपटारा

Advertisement

कामठी : -कामठी विधी सेवा समिती तसेच कामठी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज (13 जुलै) कामठी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये विविध 41 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला त्यातुन 4 लक्ष 32 हजार 398 रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच दिवाणी व फौजदारी चे 8 प्रकरणे आपसी समेटातून निकाली लावण्यात आले.

या लोक अदालतीचे उद्घाटन कामठी न्यायालयाचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी आर भोला यांच्या शुभ हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले.या लोक अदालतीसाठी 2 पॅनल नेमण्यात आले होते .पॅनल क्र 1मध्ये न्यायाधीश डी भोला, ऍड. पंकज यादव, ऍड. एम एस शर्मा, यांनी काम पाहिले तर पॅनल क्र 2 मध्ये न्यायाधीश व्ही एम गायकवाड, ऍड रिना गणवीर , ऍड एस के मानकर, यांनी काम पाहिले. अधिक प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ऍड एस एम कुशवाहा, अशोक भिवगडे, ए बी रामटेके, लईक हुसेन, भूषण तिजारे, वाय झेड बागडे, मयूर बोरकर, राजविलास भीमटे, सीमा गजभिये, सायली रामटेके, रिना गणवीर, नितेश वासनिक, प्रवीण गजवे, एम एस शर्मा, ऍड संजय राव आदींनी सहकार्य केले.

या लोक अदालतीच्या यशस्वितेसाठी सहाययक अधीक्षक कांचनवार, गोडबोले, यासह न्यायालयिन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

संदीप कांबळे कामठी