Published On : Sat, May 2nd, 2020

नागपूरमध्ये गेल्या 24 तासांत 11 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह: जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 150 वर पोहोचली

नागपूरमध्ये (Nagpur) गेल्या 24 तासांत 11 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 150 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्यात शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे 1000 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. सध्या राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 11 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. यात मुंबई शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत

दरम्यान, आज नांदेडमध्ये 20 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 35 हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत 1 हजार