| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jan 4th, 2021

  …असा होईल एक दिवसाआड पाणीपुरवठा

  • नागपूर महानगर पालिकेचे ६ जाने ते ६ फेब्रू, २०२१
  • दरम्यान जलकुंभावरून एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन


  नागपूर: येत्या उन्हाळ्यामध्ये नागपूरकराना नवेगाव खैरी (पेंच) पाण्याची टंचाई होऊ नये तसेच नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन ते नागपूर ह्या २७ किमी-२३०० मी मी व्यासाच्या जलवाहिनीवर ५ ठिकाणी होणार्या गळती मधून पाण्याची बचत करण्यासाठी नागपूर महा नगर पालिका तर्फे ह्या ५ गळत्या दुरुस्तीचे काम दि १ जानेवारी पासून हाती घेण्यात आले आहे.

  हे काम दिनांक ३१ जानेवारी पर्यंत करण्यात येणार असल्यामुळे या कालावधी दरम्यान नवेगाव खैरी येथून पंपिंग बंद राहणार आहे.

  उपरोक्त कालावधीत जलसंपदा विभागाद्वारे नवेगाव खैरी च्या उजव्या कालव्यातून पाणी घेऊन महादुला स्थित पंपिंग स्टेशन येथून शहराला पाणी पुरवठा करण्यात येईल. ह्या कालावधी दरम्यान महादुला स्थित पंपिंग स्टेशन येथून गोरेवाडा आणि गोधनी स्थितः जलशुद्धीकरण केंद्र येथे देखील मर्यादित पाणी पुरवठा होणार असल्यामुळे ह्या जलशुद्धीकरण केंद्र वर आधारित असलेले लक्ष्मिनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमान नगर झोन, धंतोली झोन, मंगळवारी झोन, आसी नगर झोन, तसेच सतरंजीपुरा झोन ह्या भागात ६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी , २०२१ या कालावधीत एक दिवसाआड (alternate day) पाणीपुरवठा होणार आहे.

  ज्या वस्त्यांमध्ये सध्या २४x७ पाणीपुरवठा होत आहे अश्या भागांना सुद्धा एक दिवसाआड (alternate day) पाणीपुरवठा होणार आहे. तसेच यादरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने महानगर पालिकेने सर्व नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

  एक दिवसाआड (alternate day) पाणीपुरवठा होणारे जलकुंभ :

  पहिला दिवस: दि ६.१.२०२१ ला होणारा पाणी पुरवठा

  १) लक्ष्मिनगर झोन: खामला जलकुंभ, प्रताप नगर जलकुंभ, गायत्री नगर जलकुंभ, लक्ष्मिनगर (जुना) जलकुंभ , त्रिमूर्ती नगर जलकुंभ , टाकली सीम जलकुंभ, जयताला जलकुंभ,

  २) धरमपेठ झोन: दाभा जलकुंभ आणि टेकडी वाडी जलकुंभ, सेमिनरी हिल्स (GSR & ESR) जलकुंभ, राम नगर (GSR & ESR) जलकुंभ आणि फूटाला जलवाहिनी.

  ३) हनुमान नगर झोन: कर्वे नगर जलकुंभ

  ४) गांधीबाग-महाल झोन : सीताबर्डी फोर्ट -१ जलकुंभ, सीताबर्डी फोर्ट -२ जलकुंभ, किल्ला महाल जलकुंभ

  ५) मंगळवारी झोन: गिट्टीखदान जलकुंभ

  दुसरा दिवस – दि. ०७.०१.२०२१ ला होणारा पाणीपुरवठा

  १) लक्ष्मिनगर झोन: लक्ष्मिनगर (नवीन) जलकुंभ , त्रिमूर्ती नगर जलकुंभ , टाकली सीम जलकुंभ, जयताला जलकुंभ,

  २) धरमपेठ झोन: गोवर्नोर हाउस (Governor-House)- सिताबर्डी जलकुंभ, धंतोली जलकुंभ

  ३) हनुमान नगर झोन: ओमकार नगर (नवीन), ओमकार नगर (जुने) जलकुंभ, श्रीनगर जलकुंभ , म्हाळगी नगर जलकुंभ, हुडकेश्वर नरसाला (ग्रामीण), नालंदा नगर जलकुंभ

  ४) धंतोली झोन: रेशिमबाग जलकुंभ, हनुमान नगर जलकुंभ, वंजारी नगर १ , वंजारी नगर २ जलकुंभ

  ५) सतरंजी पुरा झोन: बोरिया पुरा जलकुंभ, बोरियापुरा फिडर मेन, वाहन ठिकाण जलकुंभ

  ६) आसी नगर झोन: नारी जलकुंभ, नारा जलकुंभ जरीपटका जलकुंभ,

  ७) मंगळवारी झोन : गिट्टीखदान जलकुंभ (गोरेवाडा क्षेत्र) , (Governor-House)- राज नगर जलकुंभ, सदर जलकुंभ

  २३०० मी मी व्यासाच्या जलवाहिनीवर ५ ठिकाणी होणार्या गळती दुरुस्ती चे काम अत्यावश्यक असल्यामुळे लक्ष्मिनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमान नगर झोन, धंतोली झोन, मंगळवारी झोन, आसी नगर झोन, तसेच सतरंजीपुरा झोन ह्या भागातील नागरिकांनी आपणास लागणारा आवश्यक पाणीसाठा करून नागपूर महानगर पालिकेस सहकार्य करावे हि विनंती.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145