Published On : Sat, Jan 20th, 2018

नागपूर सुधार प्रन्यास च्या सभापतिना सुनीता अलोणीवर कारवाई करण्यासाठी युवक काँग्रेस स्मरण आंदोलन

Advertisement

Youth Congress
नागपूर: नागपूर सुधार प्रन्यास च्या सभापतींनां श्रीमती सुनीता अलोणीवर कारवाई करण्यासाठी युवक काँग्रेस स्मरण आंदोलन नागपूर सुधार प्रन्यास वर नुकतेच नागपूर लोकसभा युवक कांग्रेस ने केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून श्रीमती सुनीता अलोणी सहायक उपसंचालक नगररचना यांच्या कथित भ्र्ष्टाचाराबाबत कागदपत्री पुरावे सादर करुण “दिपक तले अंधेरा ” आंदोलन करुण सभापतीना ७ दिवसात कारवाई करण्याचा वेळ दिला होता .

सुनीता अलोणी वर गंभीर गुन्हे असलेली व गायब झालेली चार्जशीट व त्यातील भृष्टाचाराबाबत निवेदन मार्फ़त ठोस पाऊले उचलण्यासाठी आज नागपूर लोकसभा युवक काँग्रेस चे अध्य्क्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनातं तसेच पश्चिम नागपूर विधानसभा युवक काँग्रेस अध्य्क्ष अखिलेश राजन मध्यनागपूर विधानसभा युवक काँग्रेस कार्यअध्यक्ष स्वप्निल ढोके व तुषार मदने यांच्या नेतृत्वात सुधार प्रन्यासच्या आवारात स्मरण आंदोलन करुन सभापती दीपक म्हैसकर यांनां सांगण्यात आले की २ दिवस लोटले आता ५ दिवस बाकी आहे.

७ दिवसात सभापती ने निलंबनाची कारवाई करून त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या सेवा वेतन व ईतर लाभ वसूल करावा असे झाली नाही तर नागपूर लोकसभा युवक काँग्रेस नागपूर सुधार प्रन्यास चे सभापती श्री दीपक म्हैसकर व सहायक उपसंचालक नगर रचना श्रीमती सुनीता अलोणीवर प्रिवेंशन ऑफ करप्शन एक्ट नुसार अॅन्टी करप्शन ब्यूरो मध्ये गुन्हा दाखल करू अशी चेतावनी देऊन स्मरण केले.

आजच्या या स्मरण आंदोलनात अखिलेश राजन,स्वप्निल ढोके,तुषार मदने, मोहिन खान, विशाल सदन, अमन ठेभूरे,प्रयास फ्रांसिस,राजेंद्र ठाकरे,रवी काळमेघे,अभय तिवारी,हेमंत कातुरे,सौरभ शेळके, स्वप्निल बावनकर,पंकज महल्ले,निखिल कापसे,वरुण शाह ,पूजक मदने,सागर चव्हाण ,नितिन गुरव,निखिल वांढरे ,आशीष लोनारकर,विजय मिश्रा,देवेंद्र तुमाने, हर्षल धुर्वे इत्यादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्तिथ होते.