Published On : Tue, Sep 26th, 2017

उमरेड मार्गावरील देशी दारू दुकानाविरोधात महिला संतप्त

Advertisement

नागपूर: उमरेड मार्गावरील भांडे प्लॉट, शितला माता मंदिरजवळ असलेल्या देशी दारु दुकान बंद करण्यासाठी आज मंगळवारी परिसरातील महिलांनी तिव्र आंदोलन केले. न्यायालयाच्या आदेशानंतर सुरु झालेल्या या दारु दुकानांमुळे नागरिक ांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सकाळला दुकान सुरु होताच देशी भांडे प्लॉट दारु दुकान हटाव कृती समितीच्या महिलांनी विद्या गयनेवार व नगरसेविका दिव्या धुरडे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी ठिय्या मांडून नारे निदर्शने केलीत.

प्रभाग -२७ मध्ये येणाºया भांडे प्लॉट, उमरेड मार्गावर असलेल्या या दुकानालगत शितला माता मंदीर तर समोरच प्रियदर्शनी महाविद्यालयाचे मुलींचे वसतीगृह आहे. उमरेड-नागपुरला जोडणारा हा शहरातील मुख्य मार्ग असलेल्या वर्दळीचा परिसर मानला जातो. दुकानासमोर असलेल्या गर्दीमुळे अनेकदा अपघात आणि वाहतुक विस्कळीत होते. मद्यपींचा राडा दरारोज होत असल्याने अनेकदा छोटे मोठ हल्ल्यांच्या घटनाही त्या ठिकाणी घडल्या. दुकान हे मुख्य रस्त्यावर असून मोठा ताजबाग व छोटा ताजबागला जोडणारा मार्ग हा मानला जातो. त्यामुळे याच रस्त्यावरुन मिरवणूक जात असतात त्यामुळे अनेकदा अडथळाही निर्माण होतांना दिसून आले. याशिवाय दुकानामुळे या परिसरात शिवीगाळ, छेडछाड आदींसारख्या घटना नेहमीच घडतात.

या कारणावरून या ठिकाणी अनेकदा वाद होऊन मोठ्या घटनासुद्धा घडल्या आहेत. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळलेल्या परिसरातील महिलांनी या दुकानाविरोधात काही दिवसांपूर्वी आंदोलनही केले. प्रशासनाला निवेदनामार्फत विनंतीही केली. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतर दुकान बंद झाले. मात्र, पुन्हा दारु व्यवसायिकांच्या पक्षात आलेल्या निर्णयाने दुकान सुरु झाले. मंगळवारी पहिल्याच दिवशी दुकान सुरु होताच शेकडो महिलांचा जमावाने ठिय्या आंदोलन करून रोष प्रकट केले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. दुपारपर्यंत हा तणाव कायम होता.

नारे निदर्शनानंतर महिलांनी नंदनवन ठाण्यात सहा पोलिस निरीक्षक साळुंके यांना दोन महिलांच्या हस्ताक्षराचे निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेविका दिव्या धुरडे, विद्या गयनेवार, विना चौरागडे, चित्रा कलोडे, अनुजा सहारे, रेखा चरडे, माया भेंडे, कल्पना धुमाळ, विमल कलोडे, लता मांजरे, संगिता निलटकर, उमा तिवस्कर, शितल निलटकर आदि महिलांची उपस्थिती होती. बुधवारी जिल्हाधिकाºयांना भांडे प्लॉट देशी दारु दुकान हटाव कृती समिती महिलांचे निवदेन देण्यात येणार आहे. प्रशासनातर्फे मतदान करण्याची मागणी समितीतर्फे करण्यात येत आहे.

(चौकट)
दारुड्यांचा ताडंवच
दारूच्या दुकानामुळे नेहमीच मद्यपींची गर्दी असते. महिला व मुलींना या रस्त्याने जाणे कठीण झाले आहे. अनेकदा या भागात मारामारी महिलांची छेङखानी, लुटपाट या सारखे प्रकार झाले आहेत. इतकेच नव्हे तर खूनाचा प्रयत्नही अनेकदा झालेला आहे. यामुळे परिसरातील मुलांचे भविष्य धोक्यात आहे. यामुळे याभागात दिवसें दिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत.