Published On : Mon, Oct 16th, 2017

बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीने नाराज झाल्या होत्या सोनिया गांधी: प्रणव मुखर्जीं

Advertisement

Pranv meets Balasaheb Thackreay
मुंबई/नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आत्मचरित्राचे ‘दी कोएलिशन ईअर्स 1996-2012’ (The Coalition Years 1996 to 2012 ) प्रकाशन शुक्रवारी (14 ऑक्टोबर) दिल्लीत करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या आत्मचरित्रात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रणव मुखर्जी यांनी पुस्तकात लिहिले आहे की, 2012 मध्ये ते राष्‍ट्रपती निवडणुकीपूर्वी ‘मातोश्री’वर जाऊन त्यांनी शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. यावरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी प्रचंड नाराज झाल्या होत्या.

प्रणव मुखर्जी यांनी आपल्या आत्मचरित्रातून धक्कादायक खुलासे केल्यामुळे आता ‘दी कोएलिशन ईअर्स 1996-2012’ पुस्तक चर्चेत आले आहे.

प्रणब मुखर्जी यांनी सोनिया गांधी यांच्याशी बाळासाहेब यांच्या भेटी संदर्भात चर्चाही केली होती. मातोश्रीवरून भेटीचे वारंवार मेसेजही येत होते. परंतु, बाळासाहेबांची भेट घ्यावी, याबाबत सोनिया गांधी सकारात्मक नव्हत्या. त्या म्हणाल्या, ‘शक्य असेल तर बाळासाहेबांची भेट टाळा.’

प्रणब मुखर्जी यांनी सांगितले की, मी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ्यायला हवी, असा सल्ला राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सल्ला दिला होता. बाळासाहेब आणि त्यांचे समर्थक राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची प्रतिक्षा करत असून त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मुंबईत आले आहात आणि बाळासाहेबांची भेट घेतली नाही तर त्यांचा अपमान केल्यासारखे होईल, असेही पवार म्हणाले होते. त्यामुळे सोनिया गांधी यांची परवानगी न घेता बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. कारण मी त्यांना अपमानित करू इच्छीत नव्हतो. त्यामुळे मी शरद पवार यांना आग्रह केला आणि त्यांनी मला एअरपोर्टहून थेट मातोश्रीवर कारमधून सोडले.